३० मे पासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विंडीजच्या संघाने आपल्या १५ जणांच्या सदस्यांची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे आंद्रे रसेलकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. १५ सदस्यीय संघात विंडीज निवड समितीने अनुभवी आणि नवोदीत खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. आयपीएलमध्ये सध्या आक्रमक फॉर्मात असलेल्या ख्रिस गेल आणि आंद्रे रसेलची संघात वर्णी लागलेली आहे. मात्र कायरन पोलार्ड आणि सुनील नरीनला संघात जागा मिळू शकलेली नाहीये.
असा असेल विश्वचषकासाठी विंडीजचा संघ –
जेसन होल्डर (कर्णधार), आंद्रे रसेल, अॅशले नर्स, कार्लोस ब्रेथवेट, ख्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो, एविन लुईस, फॅबिअन अॅलेन, केमार रोच, निकोलस पूरन, ओश्ने थॉमस, शाई होप, शेनॉन गॅब्रिअल, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर</p>