भारताचा आघाडीचा कंपाऊंड तिरंदाज अभिषेक वर्माचे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडेन गेलेंथीनने अभिषेकचा १४६-१४२ असा चार गुणांनी पराभव केला. ब्रॅडेनने पाच वेळा अचूक १० गुण मिळवले. २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक पॅरिसला झालेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात जेतेपद पटकावून या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. याशिवाय २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत अभिषेकने रौप्यपदकही जिंकले होते. त्यानंतर २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अभिषेकने वैयक्तिक कांस्य आणि ज्योती सुरेखा व्हेन्नमच्या साथीने मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup archery abhishek lost in the first round akp
First published on: 01-10-2021 at 01:23 IST