लंडन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा मात केली आहे. ५ व्या – ८ व्या क्रमांकासाठी खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६-१ असा धुव्वा उडवला. उपांत्यपुर्व फेरीत भारताचं आव्हान मलेशियाकडून संपुष्टात आलं होतं. ३-२ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताला आज परत पाकिस्तानशी सामना करावा लागला. याआधी साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला ७-१ अशी धूळ चारली होती. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही पाकिस्तानवर मात करुन भारत स्पर्धेचा शेवट गोड करणार का याकडे सर्व भारतीयांच्या नजरा लागलेल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्यक्ष सामन्यातही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानवर पहिल्या मिनीटापासून दबाव टाकायला सुरुवात केली. ८ व्या मिनीटाला रमणदीप सिंहने भारताचं खात उघडलं. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंचा ताळमेळ हा अव्वल दर्जाचा होता. आकाशदीप सिंह, रमणदीप सिंह, एस.व्ही. सुनील यांनी सुरेख चाली रचत पाकिस्तानी आक्रमण अक्षरशः उध्वस्त करुन टाकलं. भारतीय खेळाडूच्या एकाही चालीचं उत्तर पाकिस्तानी खेळाडूंकडे दिसतं नव्हतं. अशातचं भारताने पाकिस्तानवर लागोपाट दुसरा हल्ला चढवला. २५ व्या मिनीटाला प्रदीप मोरने लगावलेल्या एका जोरदार फटक्याला तलविंदर सिंहने हलकेच दिशा देत बॉल गोलपोस्टमध्ये ढकलण्याचं काम केलं आणि भारताची आघाडी २-० अशी वाढवली. हा गोल इतक्या सहजतेने झाला की पाकिस्तानी गोलरक्षक अमजद अली आणि इतर खेळाडूंना त्यावर व्यक्त होण्याचाही वेळ मिळाला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World hockey league 2017 india beat pakistan in 5th and 8th position match
First published on: 24-06-2017 at 17:55 IST