भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) आजपासून रंगणार आहे. मागील दोन वर्षांपासून भारत आणि न्यूझीलंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत या अंतिम सामान्यामध्ये प्रवेश केला. आजपासून सुरु होणाऱ्या या अंतिम सामन्यात जगातील सर्वोत्तम कसोटी संघ कोण आहे हे निश्चित होईल. भारताबद्दल बोलायचं झाल्यास डावखुऱ्या हाताचा फलंदाज असणारा ऋषभ पंत (Rishabh Pant) हा हुकुमी एक्का ठरु शकतो. पंत अंतिम सामन्यासाठी तयार असून त्याने इंट्रा स्वाड सामन्यांमध्ये दमदार शतक ठोकलं आहे. शुक्रवारी होणाऱ्या या सामन्याआधी पंत ज्या खेळाडूला आदर्श मानतो त्या एम. एस. धोनीचा फोटो त्याला दाखवण्यात आला असता त्याने अगदी भावनिक प्रतिक्रिया देताना राहुल द्रविडचीही आठवण काढली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोनीबद्दल काय म्हणाला?

अंतिम सामन्याआधी भारतीय संघातील काही खेळाडूंच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये त्यांनी पोस्ट केलेले सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो त्यांना दाखवण्यात आले आणि त्यासंदर्भात विचारण्यात आलं. पंतला धोनीचाही एक फोटो दाखवण्यात आला. या फोटोमध्ये धोनी पंतला पदार्पणाच्या सामन्यात संघाची टोपी देताना दिसत आहे. पंतने या फोटोबद्दल बोलताना हा आपल्या कारकीर्दीमधील खास क्षणांपैकी एक होता असं सांगितलं. आपण ज्याला आदर्श मानतो त्या खेळाडूकडून आपल्याला पदार्पणासाठी कॅप मिळणं हा फार छान अनुभव होता. यावेळी धोनीने मला केवळ क्रिकेटचा आनंद घे, असा सल्ला दिल्याचंही पंतने सांगितलं.

नक्की वाचा >> India vs Sri Lanka Series: क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या बेडवर दिसली अशी वस्तू की चाहत्यांनी केलं ट्रोल

पंतला झाली द्रविडची आठवण

पंत १९ वर्षांखालील संघासाठी खेळायचा तेव्हाचा एक फोटो त्याला दाखवण्यात आला. या मालिकेमध्ये पंत द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळला होता. “ही माझी १९ वर्षांखालील क्रिकेटमधील पहिली मालिका होती. राहुल सर आमचे प्रशिक्षक होते. मला मालिकावीर पुरस्कार मिळालेला,” असं या फोटोबद्दल बोलताना पंतने सांगितलं. तसेच  कोलकात्यामधील खेळपट्टी फारच अवघड होती. मात्र असं असतानाही आपल्याला संघासाठी चांगली कामगिरी करता आल्याचं सामाधान पंतने व्यक्त केलं.

…आणि जडेजाने धोनीच्या चेहऱ्याला दही लावलं

पंतला धोनीच्या वाढदिवसाचा एक जुना फोटो दाखवण्यात आला. या फोटोमध्ये धोनीच्या चेहऱ्याला दही लावल्याचं दिसत आहे. पंतने या फोटोबद्दल बोलताना, केकवर फारसं क्रीम नव्हतं. त्यामुळे जडेजाने धोनीच्या तोंडावर दही लावलं. त्यानंतर जडेजाला पकडण्यासाठी धोनी बराच वेळ त्याच्या मागे पळत होता, अशी आठवण पंतने सांगितली.

शाळेतील शिकवणी आता उपयोगात येते…

मैदानामध्ये आपण कोलांट्या उड्या आणि इतर गोष्टी इतक्या सहज कशा करु शकतो याबद्दलही पंतने खुलासा केला. मी सहावीला असताना देहरादूनमध्ये शिकायचो. तिथे मला चौधरी सरांना जिमनॅस्टीक शिकवलं होतं. त्याच गोष्टी मला आता उपयोगी पडतात, असं पंतने सांगितलं.

नक्की वाचा >> ‘त्याने’ ५४ चेंडूंमध्ये ९६ धावा करत मिळवून दिला संघाला विजय; आंतरराष्ट्रीय कारकीर्द मात्र संपल्यात जमा

त्या कसोटी विजयाबद्दल म्हणाला…

पंतला गाबावरील भारताच्या ऐतिहासिक विजयाचा फोटो दाखवण्यात आला. या सामन्यात पंतने नाबाद ८९ धावांची खेळ करत भारताला विजय मिळवून दिला होता. या विजयामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांना घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. हा खूप खास क्षण होता असं पंत या फोटोबद्दल बोलताना म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World test championship final insta memories with rishabh pant talks about m s dhoni rahul dravid scsg
First published on: 18-06-2021 at 09:11 IST