भारताचा नवोदीत कुस्तीपटू दिपक पुनियाला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ८६ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य फेरीत खेळताना झालेल्या दुखापतीमुळे दिपक अंतिम फेरीत खेळूच शकला नाही, ज्यामुळे इराणच्या हझसन याझदानीला सुवर्णपदक बहाल करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझा डावा पाय प्रचंड दुखत आहे. खेळत असताना तो पाय शरीराचा भार पेलवू शकणार नाही हे मला जाणवलं. अशा परिस्थितीत मी खेळू शकणार नव्हतो. माझ्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी होती, पण माझा नाईलाज आहे.” दिपकने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना आपली प्रतिक्रीया दिली. आपल्या पहिल्याच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दिपकने रौप्यपदकाची कमाई केली आहे. उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या स्टिफन रेचमर्थ याच्याविरोधात खेळताना दिपकला दुखापत झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World wrestling championship deepak punia pulls out of final settles for silver psd
First published on: 22-09-2019 at 13:57 IST