उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेला यष्टिरक्षक-फलंदाज आता रविवारी होणाऱ्या सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
या वर्षी आयपीएलमध्ये आपल्या गुणवत्तेची छाप पाडणारा बंगालचा यष्टिरक्षक साहाने प्रभारी कर्णधार विराट कोहलीच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी कसून सराव केला. त्याने नेटमध्ये १५ मिनिटे फलंदाजीही केली. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत साहाला पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. दुलीप करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पूर्व विभागाकडून खेळताना साहाच्या हाताला दुखापत झाली होती. त्यावेळी दुसऱ्या डावातही तो फलंदाजीला उतरला नव्हता.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2014 रोजी प्रकाशित
श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात वृद्धिमन साहाला संधी
उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेला यष्टिरक्षक-फलंदाज आता रविवारी होणाऱ्या सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
First published on: 01-11-2014 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wriddhiman saha almost certain to play in first odi against sri lanka