आरसीबीचा स्टार फलंदाज यश दयाल याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यश दयालवर गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील एका मुलीने लैंगिक छळाचा आरोप केला होता, त्यानंतर त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि आता या खेळाडूने त्या प्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यश दयालने धक्कादायक दावा करत म्हटलं आहे की, ज्या मुलीने त्याच्याविरुद्ध हा खटला दाखल केला आहे तिने त्याचा आयफोन आणि लॅपटॉप चोरला आहे.
यश दयालने धक्कादायक दावा करत म्हटलं आहे की, ज्या मुलीने त्याच्याविरुद्ध हा खटला दाखल केला आहे तिने त्याचा आयफोन आणि लॅपटॉप चोरला आहे. एवढंच नाही तर यश दयाल यांनी त्यांच्यावर लाखो रुपयांची चोरी केल्याचा आरोपही केला आहे. यश दयालने प्रयागराज पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
२७ वर्षीय यश दयालने लैंगिक छळाच्या आरोपांवर उत्तर देत म्हणाला, २०२१ मध्ये त्याने या मुलीशी इन्स्टाग्रामवर बोलायला सुरूवात केली. इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख वाढली. यश दयालने आरोप केला की मुलीने तिच्या उपचारांच्या नावाखाली आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारांच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये घेतले. मुलीने हे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते पण आजपर्यंत तिने एक पैसाही परत केलेला नाही.
यश दयालने मुलीवर आयफोन आणि लॅपटॉप चोरण्याचा आरोप केला आहे. प्रयागराजमधील खुलदाबाद पोलिस ठाण्यात तीन पानांची तक्रार दाखल केली आहे. यश दयालने मुलीविरुद्ध लवकरात लवकर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
७ जुलै रोजी यश दयालविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. इंदिरापुरममध्ये राहणाऱ्या त्या मुलीने आरोप केला की यश दयालने लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. मुलीने असंही म्हटलं की ती यश दयालच्या कुटुंबाला ओळखते. आणि त्यांना अनेक वेळा भेटली आहे.