FIR Filed Against RCB Pacer Yash Dayal: भारताचा आयपीएलमधील स्टार खेळाडू यश दयाल सध्या मोठ्या अडचणीत आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसीचे हे कलम अजामीनपात्र आहे. या कलमानुसार यश दयालला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, पीडित मुलीने यश दयालवर लग्नाचे आमिष दाखवून तिचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने तिच्या आरोपांसंदर्भात व्हॉट्सअॅप चॅट्स, व्हिडिओ कॉल्स आणि फोटोंचे स्क्रीनशॉट असे पुरावे देखील सादर केले आहेत, ज्याची पोलिस चौकशी करत आहेत.
एखाद्या पुरुषाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन किंवा फसवणुकीने एखाद्या महिलेसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले असतील, तर त्यावर या कलमांतर्गत कारवाई होते. या कलमाअंतर्गत दोषी आढळल्यास आरोपीला दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
पीडितेने यश दयालवर केलेल्या आरोपांची चौकशी पोलिसांनी अद्याप सुरू केलेली नाही. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर आणि तिचा जबाब कायदेशीररित्या दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवल्यानंतरच पोलिस कारवाई सुरू होईल. पोलिस कारवाईचा भाग म्हणून यश दयालला अटकही होण्याची शक्यता आहे. जर यश दयालवरील आरोप तपासात खरे सिद्ध झाले आणि तो दोषी आढळला तर त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
पीडित मुलगी गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. यश दयालविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल करताना तिने सांगितले की, ती गेल्या ५ वर्षांपासून क्रिकेटपटूसह रिलेशनशिपमध्ये होती. तो यश दयाळच्या घरी वारंवार येत असे. मात्र, आतापर्यंत यश दयाल किंवा त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात कोणतेही विधान केलेलं नाही. सोशल मीडियावरही कोणतीही प्रतिक्रिया दिसून आलेली नाही.
एफआयआरमध्ये असंही म्हटलंय की, त्या पीडित मुलीला काही दिवसांनंतर यश दयाल इतर काही मुलींसह रिलेशनशिपमध्ये असल्याचे आढळले. यानंतर यश दयालविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पीडित मुलीने प्रथम १४ जून रोजी महिला हेल्पलाइन क्रमांक १८१ वर फोन केला. परंतु तिथे कोणतीही मदत न मिळाल्याने तिने २१ जून रोजी मुख्यमंत्री हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली.