15 December 2019

News Flash

दोन दिवस भटकंतीचे : देवरुख

देवरुखवरून २० कि.मी.वर असलेल्या मार्लेश्वरला जावे. कोसळणारा धबधबा पावसाळ्यात रौद्र दिसतो.

(संग्रहित छायाचित्र)

शनिवार

सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेले रत्नागिरी जिल्ह्य़ातील देखणे गाव देवरुख! येथून जवळच टिकलेश्वरला जावे. तेथील सुंदर शिवालय पाहावे. प्रदक्षिणा पाण्याची टाकी दिसतात. पूर्वेला सह्य़ाद्रीची रांग राकट दिसते. सगळा चांदोली अभयारण्याचा हा प्रदेश. परत देवरुखला यावे. तिथून मस्त ट्रेक आहे. बेलारीमाचीमार्गे मैमतगडला जावे. पायथ्यापासून दीड तास लागतो. हा सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेला, सुंदर प्रवेशद्वार आणि पूर्ण तटबंदी शाबूत असलेला गड आहे. माथ्यावर काही तोफा, पाण्याचे टाके, नंदी, शिवपिंड तसेच काही मूर्ती ठेवल्या आहेत. इथून चांदोलीचा परिसर सुंदर दिसतो.

रविवार

देवरुखवरून २० कि.मी.वर असलेल्या मार्लेश्वरला जावे. कोसळणारा धबधबा पावसाळ्यात रौद्र दिसतो. पायथ्याच्या मारळ गावापाशी वाहन ठेवून पायऱ्यांनी चढून जावे लागते. माथ्यावर गुहेत शिवपिंडी आहे. मंदिराच्याच बाजूला धबधबा कोसळताना दिसतो. सगळाच परिसर रमणीय आहे. तिथून परत देवरुखला यावे आणि ३० कि.मी.वरील माचाळला जावे. हे सुंदर डोंगरावर असलेले ठिकाण आहे. इथे वाहन खाली ठेवून कच्च्या रस्त्याने चालत जावे लागते. वर गेल्यावर जमिनीलगत पाण्याची मोठी टाकी आहेत. निवळशंख पाणी फारच सुंदर. इथेच मुचकुंद ऋषी गुहा आहेत.

ashutosh.treks@gmail.com

First Published on September 7, 2018 5:13 am

Web Title: article about two days travel
Just Now!
X