अजय महाडिक

मोटरकार विकत घेताना बऱ्याचदा सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीपुढे अनेक प्रश्न पडलेले असतात. अशावेळी सल्ला देणारेही बरेच असतात. आणि त्यातून उडणारा गोंधळही मोठा असतो. या गोंधळातून मार्ग काढताना आपण आपल्या सोयी व गरजांचा विचार प्रथम करावा. तरी हा तिढा सोडवण्यासाठी काही बाबींचा जर डोळस विचार केल्यास निर्णय घेणे सोपे जाईल.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी

चारचाकी गाडी विकत घेण्याचा विचार मनात आला की, घरातही एक वातावरण निर्मिती होत असते. ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. विविध कंपन्या, सुखसोयी, तऱ्हेतऱ्हेच्या गरजा भागवणारे मॉडेल्स बाजारात उपलब्ध असतात. नवीन मोटर कार विकत घेताना ग्राहकाने स्वत:ला दो प्रश्न विचारावेत ‘मी कशा करता कार विकत घेत आहे’ आणि ‘मी किती कालावधीसाठी ती वापरणार आहे’ त्यानंतर प्रवासी क्षमता, किमंत, आर्थिक तयारी, मोटरकारची ताकद, दर्शनी भाग, सुरक्षितता, प्रवासी सामान वाहुन नेण्याची क्षमता, आर्थिक साहाय्यासंबंधी उपलब्ध पर्याय, मोटरकारची रिसेल व्हॅल्यू आदी बाबी कारखरेदीच्या निर्णयावर अंकूश ठेऊ शकतात. यातून बाजाराचाही अंदाज येत असतो. तसेच, ज्यांनी वाहन बाळगले आहे त्यांचे अनुभवी मार्गदर्शन, खरेदीपूर्वी प्रत्यक्ष चालवून केलेले परिक्षण वाहन खरेदीचा निर्णय पक्का करण्यापूर्वी विचारात घेणे आवश्यक असते.

वाहन बाजारपेठेत वाहन खरेदीचा निर्णय काही आर्थिक गुंतवणूक करण्याचा विषय नाही. खरं तर तो पैशाचा व्यय आहे. त्याच्या घसाऱ्याचा वेगही खूप आहे. त्यामुळे निट विचार करणे आवश्यक ठरते. कुठल्या कंपनीची मोटरकार विकत घ्यावी या करीता कोणतेही ठोकताळे नाहीत. परदेशात आपली क्षमता सिद्ध केलेल्या  व तेथील बाजारपेठ काबीज केलेल्या अनेक गाडय़ा आजघडीला भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. भारतातील परिस्थितीशी व बाजारपेठेशी जुळवून घेणारी ही मॉडेल्स आहेत. ही मॉडेल्स तांत्रिक दृष्टय़ा किंवा विश्वासार्यतेबाबत एकदुसऱ्याशी तीव्र स्पर्धा करतात. त्यामुळे आपापल्या जातकुळीत त्या तुल्यबळ असतात त्यामुळे ग्राहकांच्या मनात प्रश्न व गोंधळ असू शकतो.

मोटरकारची किमत ही तिच्या एक्स फॅक्टरी मूलभूत किंमत अधिक त्यावरील निरनिराळे कर, आकार, विमाशुल्क, नोंदणीशुल्क, विमा शुल्क, अ‍ॅक्सेसरीज, देखभालीवरील खर्च, कार वापरण्याचा खर्च, फेरविक्रीच्या वेळी सोसावे लागणारे नुकसान या सर्व बाबी विचारात घेऊनच मोटरकाची एकूण किंमत ठरत असते. सर्व साधारणपणे दरवर्षी मोटरकारच्या बाजारात मार्च ते सप्टेंबर या काळात मंदीचे वातावरण असते. या काळात ग्राहकास किंमतीविषयी घासाघीस करता येते व कारच्या एकूण किमतीवर नियंत्रण ठेवता येते. दसरा, दिवाळी व नाताळात बाजारात तेजी असल्याने घासाघीस करणाऱ्या ग्राहकांना विक्रेते फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीत ही बाब येथे लक्षात घ्यावी.

नवीन मोटरकारसमवेत ओनर्स मॅन्युअल नावाची पुस्तिका येते. त्यात वाहनासमवेत मोफत मिळणाऱ्या सर्व सुटय़ा भागांची यादी दिलेली असते. या यादीनुसार ती तपासून घ्यावीत. मोटरकार सोबत सव्‍‌र्हिस मॅन्युअल नावाचीही एक पुस्तिका येते. काही विक्रेते ओनर्स मॅन्युअल व सव्‍‌र्हिस मॅन्युअल म्हणून एकत्रितरीत्या पुस्तिका बनवतात. तथापि सव्‍‌र्हिस र्मन्युअल वेगळे असल्यास ते ग्राहकाने मागितल्याशिवाय पुरवले जात नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे. आपल्या वाहनाची देखभाल कशा प्रकारे करावी याविषयी या पुस्तिकेत साद्यंत माहिती असते.

विकाऊ वाहन घेताना दक्ष रहा

सर्वप्रथम मोटारकारचा इंजिन क्रमांक व चासिस क्रमांक व संबंधित नोंदणीपत्रातील इंजिन व चासिस क्रमांक एकच असल्याची खात्री करून घ्यावी. विकाऊ वाहनावर एकदा नीट नजर टाकावी. म्हणजे नव्याने रंगरंगोटी केली असल्यास खरेदीदाराने जास्त दक्ष राहावे. तळाशी अंथरलेले जाजम ते जुनेपुराणे असले तरी उचलून वाहनाचा तळपत्रा तपासून घ्यावा. मोटारकार सुरू करून ती रेस करावी व एक्झॉस्ट पाइपमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे निरीक्षण करावे. हा पाइप नेहमी कोरडा व गंजविरहित असावा. तो साधारण राखाडी रंगाचा असावा. जर तो बदललेला असल्यास त्याचे कारण जाणून घ्यावे. बऱ्याचदा वापरलेले वाहन बाजारात आणण्यापूर्वी ते तांत्रिकदृष्टय़ा दुरुस्त केलेले असते. त्यामुळे वरवर दिसणाऱ्या रंगरंगोटीपेक्षा इंजिन, क्लच, ब्रेक्स, चासिस, वाहनाचा आतील, बाहेरील व खालचा पत्रा इत्यादी गोष्टी मेकॅनिक कडून तपासून घ्यावे. इंजिन सुरू झाल्यावर त्याचा आवाज एकसुरी असावा. ब्रेक जर अडकून बसत असतील तर किंवा थबकत थबकत पूर्वस्थितीत येत असतील तर किंवा पूर्वस्थितीत येण्यासाठी वेळ घेत असतील तर ऑइल लिक होत आहे असे समजावे.

हे आवर्जून करा

* गाडी विकत घेण्यापूर्वी विक्रेत्याकडे उपलब्ध असणाऱ्या वाहनांमधून आपल्या पसंतीचे वाहन निवडावे, ते चालवून स्वत: चाचणी घ्यावी.

* वॉरंटीची सर्व कलमे वाहन खरेदीपूर्वीच तपासून घ्यावी. निर्मात्या कंपनीसमवेत कराव्या लागणाऱ्या करारनाम्याची कलमेही तपासून घ्यावीत. त्यातील बंधनकारक व कायदेशीर कलमांची यथोचित जाण करून घ्यावी.

* सदर करार हा बहुद्देशीय  असून  त्यात मोटर कारसाठी द्यावी लागणारी किंमत, अर्थसाहाय्य घेतल्यास त्या संबधीच्या अटी, विम्यासंबधीची कलमे, वाहन वापरासंबधीची बंधनकारक व कायदेशीर कलमे, वाहन नोंदणी विषयीची कलमे तसेच वाहन नोंदणीविषयीची बंधने इत्यादी बाबी अंतर्भूत असतात.

ajay.mahadik@expressindia.com