सीडीज जुन्या झाल्यामुळे, वापरायोग्य न राहिल्यामुळे कपाटांच्या कोनाडय़ांत त्यांचा ढीग गोळा झाला असेल, तर त्या भंगारवाल्याकडे विकण्यापूर्वी त्याचा पुनर्वापर कसा कराता येईल याचा विचार करू या. या निरुपयोगी झालेल्या सीडीज तुमच्या भिंतीची शोभा वाढवू शकतात. थोडीशी कलात्मकता दाखवल्यास ही लखलखती वर्तुळे पाहुण्यांच्या आकर्षणाचा विषय ठरू शकतात. मित्रमंडळींपैकी कोणी नवीन घर घेतले असल्यास त्यांना सजावटीसाठी भेट म्हणूनही देता येऊ शकतात. काय करता येईल, ते पाहू..

साहित्य :

४-५ जुन्या सीडी, कात्री, टिकल्या, ग्लिटर, पुठ्ठा, गम

कृती

  • सीडीपेक्षा मोठय़ा आकाराचा पुठ्ठा गोलाकारात कापा.
  • गोलाच्या मधोमध एक सीडी चिकटवा
  • इतर सीडीचे तुकडे करा.
  • पुठ्ठय़ाच्या मोकळ्या राहिलेल्या भागावर गम पसरवा आणि त्यावर या तुकडय़ांचे कोलाज करा.
  • मधल्या राहिलेल्या रिकाम्या जागांमध्ये गम पसरवा व त्यावर ग्लिटर चिकटवा.
  • बाहेरील बाजूस टिकल्यांचे सुशोभन करा.
  • उलटे करून जास्तीचे ग्लिटर काढून टाका.
  • सीडी आणि ग्लिटर नीट वाळू द्या.
  • सीडीच्या मध्यावरचे गोल कटरने कापा.
  • भिंतीवरील खिळ्याला लटकवून सुशोभित करू शकता.
  • टेबलवर किंवा टीपॉयवर उभे करून ठेवता येईल.
  • त्यावर दिव्याचा प्रकाश किंवा सूर्यप्रकाश पडल्यास तो परावर्तित होऊन घरभर लखलखाट होईल.

apac64kala@gmail.com