News Flash

सुंदर माझं घर : खोक्यातले कोडे

प्लास्टिकबंदीमुळे बरेच समान कागदात गुंडाळून किंवा खोक्यातून मिळू लागले आहे

(संग्रहित छायाचित्र)

कागदाचे डबे केराच्या टोपलीत टाकताना विचार करा. प्लास्टिकबंदीमुळे बरेच समान कागदात गुंडाळून किंवा खोक्यातून मिळू लागले आहे. या खोक्यांचा पुनर्वापर करू या.

साहित्य :

रंगीत कार्ड पेपर २, कात्री, पेन्सिल, गम, कागद, चित्रांचे जुने पुस्तक, जुना कागदी उभा खोका इत्यादी.

कृती

* जुना कागदी उभा खोका पूर्ण उघडा.

* आतील बाजूस सारख्या आकाराच्या खिडक्या कापा.

* सर्व बाजूंना रंगीत कार्ड पेपर चिकटवा.

* खोक्यावर ज्या रंगाचा कार्डपेपर चिकटवला आहे, तो रंग वगळता इतर कोणत्या तरी रंगाच्या कागदाच्या पट्टय़ा खिडकीच्या मापाने कापा.

* चित्रांच्या जुन्या पुस्तकातील चित्रे कापा. हे कोडे जे मूल सोडवणार आहे, त्याच्या वयानुसार चित्रांची निवड करा. ही चित्रे खिडक्यांच्या मापात बसतील एवढय़ाच आकाराची असावीत.

* तुमच्या चित्रकलेलासुद्धा वाव देता येईल.

* डब्यात मावतील तितक्या पट्टय़ा रंगवू शकाल.

* कोडे आपल्या आवडीनुसार डिझाइन करता येईल.

* एका पट्टीवर अक्षरे लिहून दुसऱ्या पट्टीवर त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या शब्दांची चित्रे चिकटवता येतील.

* अशाच प्रकारे विरुद्धार्थी, समानार्थी, जोडय़ा जुळवा असे खेळही तयार करता येतील.

* सतत काही नवे शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या छोटय़ा दोस्तांसाठी ही गम्मत घरच्या घरी करून पाहाच!

apac64kala@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 2:51 am

Web Title: creative ways to reuse cardboard boxes
Next Stories
1 शहरशेती : घरात झाडे कशासाठी?
2 ‘डेव्हलपर्स ऑप्शन’चे गूढ
3 मोबाइलवेडात भारत दुसरा
Just Now!
X