News Flash

ब्रोकोली उसळ

चिरलेली ब्रोकोली पाण्यात मऊ होईपर्यंत उकळून घ्यावी आणि बाजूला काढून ठेवावी.

संग्रहित छायाचित्र

आरोग्यदायी आहार :  डॉ. सारिका सातव

साहित्य

 • ब्रोकोली- १ वाटी (चिरून)
 • हळद, मीठ, जिरे, मोहरी, तेल (फोडणीपुरते)
 • मोड आलेली कडधान्ये- मूग, मटकी, वाटाणा
 • चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी
 • मिरची/ मसाला, लिंबू रस – अर्धा चमचा
 • कृती
 • चिरलेली ब्रोकोली पाण्यात मऊ होईपर्यंत उकळून घ्यावी आणि बाजूला काढून ठेवावी.
 • त्याच पाण्यात मोड आलेली कडधान्ये मीठ टाकून शिजवून घ्यावीत.
 • तेलात फोडणी देऊन कडधान्ये व ब्रोकोली परतून घ्यावे.
 • कोथिंबीर टाकून सजवावे.
 • चवीनुसार मिरची, मसाला, चाट मसाला वापरावा.
 • शेवटी लिंबूरस टाकावा.

वैशिष्टय़े :

 • ब जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व, लोह व तंतूमय पदार्थ भरपूर प्रमाणात.
 • मधुमेह, हृदयविकार, मलावष्टंभ, स्थूलता इत्यादीमध्ये उपयुक्त.
 • सकाळी व संध्याकाळी नाष्टय़ासाठी अत्यंत उपयुक्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:23 am

Web Title: foreign recipes broccoli vegetable
Next Stories
1 शैलीदार, उठावदार सेल्टोस
2 व्हिंटेज वॉर : अशीही बीएमडब्ल्यू
3 शहराएवढा एक छोटा देश
Just Now!
X