24 May 2020

News Flash

हिरव्या मसाल्यातील चिकन

अख्खा गरम मसाला भाजून घ्या. सुके खोबरे भाजून घ्या. नंतर त्यात लसूण-मिरची, थोडी कोिथबीर टाकून वाटण चांगले बारीक वाटून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

दीपा पाटील

साहित्य

१ किलो कोंबडी (चिकन), १०-१२ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या, १ वाटी सुके खोबरे किसलेले, अर्धी वाटी कोिथबीर, १ मोठा चमचा खसखस, ५ लवंगा, २ दालचिनी तुकडे, १०-१२ मिरी, १ चमचा हळद, १ मोठा चमचा गरम मसाला, अर्धी वाटी तूप, मीठ चवीनुसार.

कृती

अख्खा गरम मसाला भाजून घ्या. सुके खोबरे भाजून घ्या. नंतर त्यात लसूण-मिरची, थोडी कोिथबीर टाकून वाटण चांगले बारीक वाटून घ्या. चिकनला वाटण लावून अर्धा तास ठेवा. कढईत तूप गरम करा. त्यात ४-५ लसूण पाकळ्या टाका. नंतर त्यात हळद व वाटण लावून ठेवलेले चिकन टाका व मीठ टाकून चांगले शिजवा. शिजल्यानंतर त्यात गरम मसाला व कोथिंबीर टाका.

टीप

कोथिंबीर वाटण्यापेक्षा बारीक कापून टाकल्यास त्याला चांगला हिरवा रंग येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2020 12:11 am

Web Title: green spiced chicken recipe abn 97
Next Stories
1 उत्सवाचे पर्यटन : वाळवंटातील उत्सव
2 घरातल्या घरात : आकर्षक फुलदाण्या
3 शहर शेती : घरातील वृक्षसंवर्धन
Just Now!
X