घरातलं विज्ञान : सुधा मोघे-सोमणी मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

रबर हा असा पदार्थ आहे जो त्याच्या विविध रूपांमध्ये आपण अनेक ठिकाणी वापरतो. पेन्सिलने लिहिताना चुकलो तर खोडरबर, बागेत पाणी घालायचे आहे तर वापरला जाणारा रबरी पाइप, सायकल, स्कूटर, कार यांचे टायर..

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

झाडांपासून मिळणाऱ्या ‘लॅटेक्स’ या द्रव पदार्थापासून रबर मिळवतात. झाडांना इजा झाल्यास ते ‘लॅटेक्स’ नावाचा द्रव स्रवतात. विविध झाडांचे लॅटेक्स विविधरंगी असतात व त्यांची मात्रादेखील कमी-जास्त असते. रबरच्या झाडाला काप देऊन त्याचे लॅटेक्स जमा केले जाते. या ‘लॅटेक्स’पासून नैसर्गिक रबर मिळवले जाते ज्याचे अनेक उपयोग आहेत. नैसर्गिक रबरमध्ये ‘आयसोप्रीन’ नावाच्या सेंद्रीय संयुगाचे बहुवारिक असते. त्यात तो कशासाठी वापरला जाणार आहे त्याप्रमाणे इतर घटक मिसळून रबर मिळते.

सर्वप्रथम मध्य अमेरिकेत याचा वापर बॉल बनवण्याकरिता केला गेला. मग रबरी डबे बनवले गेले. चाल्स कोंदामाइन यांनी इ.स. १७५१ मध्ये रबरच्या गुणधर्माचा अभ्यास करुन शोध निबंध लिहिला. रबरची माहिती हळूहळू जगभर पसरु लागली. इ.स. १७७० मध्ये जोसेफ प्रिस्टले यांच्या लक्षात आले की रबराने घासल्यावर (रब केल्याने) पेन्सिलीने लिहिलेले खोडता येते, म्हणून त्याचे नाव ‘रबर’ हे प्रचलित झाले.

रबरचे अनेकिवध उपयोग असण्यामागे त्याचे वैशिष्टय़यपूर्ण गुणधर्म हे आहेत, ताण दिल्यावर न तुटता ताणले जाणे (इलास्टोमर), त्याच्या अंगी बल सहन करण्याची ताकद व त्याचा इतर रबरी अणुंना चिकटून राहण्याचा गुणधर्म हळूहळू रबर लोकप्रिय होऊ  लागले. ताणल्या जाण्याचा गुणधर्म हा केवळ रबर या बहुवारिक (पॉलिमर) मध्ये आढळतो. इतर बहुवारिक हे प्लास्टिक स्वरूपाचे असतात. याचा अर्थ ताणल्यावर ते तुटतात.

अनेक शास्त्रज्ञांनी इ.स.१७५१च्या गुणधार्माचा सखोल अभ्यास केला. यात चार्ल्स गुडइअर, जॉन डनलॉप हे प्रमुख. रबर जरी अनेक ठिकाणी उपयोगात आणला जात होता तरी तो कठीण नसल्या कारणाने त्याच्या वापरावर मर्यादा येत होत्या. यावर चार्ल्स गुडइअर यांनी इ.स.१८३९ मध्ये उपाय शोधून काढला. नैसर्गिक रबरमध्ये ठरावीक प्रमाणात गंधक (सल्फर) मिळवल्यास रबर हवे त्या प्रमाणात कठीण बनवण्यात त्यांना यश आले. यावर अधिक प्रयोग करून त्यांनी १८४४ साली या प्रक्रियेचा पेटंट मिळवला. ही प्रक्रिया म्हणजे वल्कनायझेशन. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर, अवजारांची मूठ, कुकर, कढई यांची मूठ,  सायकल, वाहने यांची चाके ही वल्कनायझेशन केलेल्या रबराची बनवली जाऊ लागली. त्यात डनलॉप यांनी न्यूमॅटिक टायर (हवा भरलेले टायर) याचा शोध लावला. नैसर्गिक रबरमध्ये १ ते ३ टक्के गंधक मिसळवून मिळणाऱ्या रबर चा उपयोग रबर बँड बनवण्यासाठी केला जातो. ३ ते ५ टक्के गंधक मिसळवून १०० ते १५० डिग्री सेंटिग्रेडपर्यंत तापवले असता मिळणाऱ्या रबरापासून टायर तयार करतात. गंधक मिसळल्याने रबरातील चिकटपणा हा गुणधर्म काही प्रमाणात कमी करता येतो. रबराचे असे विविध उपयोग लक्षात आल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांची सत्ता असलेल्या देशांमध्ये दक्षिण अमेरिकेतून रबराची झाडे सिंगापूर, मलेशिया, थायलंड, भारत येथे सर्वत्र लावली.

जसं विज्ञान प्रगत झालं तसं वांच्छित गुणधर्मासाठी या रबरामध्ये विविध सेंद्रिय संयुगांची भर पडली. या प्रक्रियेला क्युरिंग असे म्हणतात. साधे टायर (रबरी) विजेचे दुर्वाहक असते. पण विमानांच्या चाकांचे धावताना प्रचंड घर्षण होते व त्यामुळे त्यावर स्थितिक विद्युत निर्माण होते जे धोक्याचे आहे. तसे होऊ नये म्हणून विमानाची चाके विद्युतवाहक रबरपासून बनवली जातात.