27 September 2020

News Flash

योगस्नेह : वृक्षासन

पायाचे स्नायू मजबूत होण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

(संग्रहित छायाचित्र)

हे आसन करताना शरीराचा आकार एखाद्या झाडासारखा वाटतो. म्हणून या आसनाला वृक्षासन म्हणतात. या आसनामध्ये संपूर्ण शरीराला ताण मिळत असल्याने शरीर लवचीक होते. पायाचे स्नायू मजबूत होण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

कसे करावे?

* सर्वप्रथम ताठ उभे राहा. डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. दीर्घ श्वास घ्या. आता संपूर्ण शरीराचा तोल एका पायावर असेल. तोल सांभाळण्याचा प्रयत्न करावा.

* आता दोन्ही हात कानालगत वर आणावे. हात वर आणल्यानंतर हातांना ताण द्यावा. हात ताठ ठेवून हाताचे पंजे एकमेकांना चिकटावेत. हात वर घेताना श्वास सोडावा. या स्थितीत १० सेकंद राहा.

*  आसन सोडताना आधी हात खाली आणा. त्यानंतर एका हाताच्या साहाय्याने पायाला खाली आणा.  हेच आसन दुसऱ्या बाजूने करावे.

* हे आसन सुरुवातीला करणे जमणार नाही. त्यामुळे भिंतीचा आधार घ्यावा. आसन सोडताना पाय खाली आणण्याची घाई करू नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:02 am

Web Title: how to do vrikshasana yoga health benefits
Next Stories
1 रोड ट्रिपवर जाताना..
2 नवं काय? : बदलते दिवे
3 व्हिंटेज वॉर : वैर नावीन्याचे
Just Now!
X