हाताने कपडे धुणे हा प्रकार आता जवळजवळ नामशेष झाला आहे. वॉशिंग मशीनमुळे  (धुलाई यंत्र) कपडे धुणे अधिक सुलभ झाले आहे. मात्र या यंत्राची योग्य देखभाल केली आणि निगा राखली तरच हे यंत्र अधिक काळ उपयुक्त ठरू शकते.

  • वॉशिंग मशीनमध्ये पाणी भरणारी आणि पाण्याचा निचरा करणारी नळी दर महिन्याला एकदा तपासली पाहिजे. या नळ्या नादुरुस्त झाल्या असतील किंवा त्याला छिद्र पडले असेल तर त्या त्वरित बदला. या नळ्या जर गळत असतील, तर वॉशिंग मशीन खराब होण्याचा धोका संभवतो. गळतीमुळे घरातही पाणी साचून इतर वस्तू खराब होऊ शकतात. प्रत्येक पाच वर्षांनी या नळ्या बदलल्या पाहिजे. चांगल्या प्रतीच्या नळ्या वापराव्यात.
  • वॉशिंग मशीन शक्यतो स्नानगृहाच्या (बाथरूम) जवळ असावे. ज्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये पाणी सहज भरता येईल आणि कपडे धुतल्यानंतर आतील पाण्याचा निचराही सहजपणे करता येईल.
  • वॉशिंग मशीनची क्षमता असेल तितकेच कपडे त्यामध्ये धुण्यासाठी टाकले जावेत. क्षमतेपेक्षा अधिक कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यास मशीन नादुरुस्त होण्याचा धोक असतो.
  • वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकण्यापूर्वी कपडय़ांचे खिसे तपासून घ्यावे. धातूचे नाणे किंवा इतर वस्तूंमुळे मशीन खराब होऊ शकते.
  • दररोज कपडे धूत असाल तर किमान १० दिवसांतून एकदा वॉशिंग मशीनचा टब पाण्याने स्वच्छ धुवा. त्यामुळे टबमध्ये राहिलेला साबण निघून जाईल. दररोज कपडे न धुणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तरी टब साफ करावा.
  • वॉशिंग मशीनमध्ये चांगल्या प्रतीचे डिर्टजट वापरावे. गरजेचे असेल तितकेच डिर्टजट वापरावे. अधिक डिर्टजट वापरल्यास वॉशिंग मशीन नादुरुस्त होऊ शकते.
  • वॉशिंग मशीनची बाहेरील बाजूही साफ करणे आवश्यक आहे. ओल्या कपडय़ाने बाहेरील बाजू साफ करावी.

Three more flamingo deaths in nerul Demand for inquiry
आणखी तीन फ्लेमिंगोचा मृत्यू… नैसर्गिक की हत्या? चौकशीची मागणी 
Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
Veg Tawa Fry Bhaji Recipe In Marathi
हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी