ऑफरोड ड्रायव्हिंगकडे कार कंपन्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ऑफरोड ड्रायव्हिंग म्हणजे केवळ खडकाळ रस्त्यांवरून प्रवास नाही तर गाडीची परिपूर्ण क्षमता पणाला लावण्याची परीक्षा. अशा या ऑफ-रोड ड्राइव्हचा अनुभव द अबोव्ह अ‍ॅण्ड बीयॉण्ड टूरमधून चालकांना मिळाला. द अबोव्ह अ‍ॅण्ड बीयॉण्ड टूर ही इव्हेण्ट्सची सीरिज नैसर्गिक रस्त्यांवर ऑफ-रोड ड्राइव्ह अनुभव देते आणि लॅण्ड रोव्हर गाडय़ांची क्षमता दाखवते. या गाडय़ांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न करता  डिस्कव्हरी स्पोर्ट व रेंज रोव्हर इवोक व्हेइकल्स ड्रायव्हिंगचा अनुभव या सीरिजमध्ये देतात.

पूरग्रस्त रस्ते, खराब रस्ते, आणि खड्डेयुक्त रस्ते इत्यादी रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी लॅण्ड रोव्हरची क्षमता चालकांना समजावून देण्यासाठी ही टूर मदत करते. चंदिगड, नोएडा, गुरूग्राम, अहमदाबाद, इंदौर व नागपूर या शहरांपर्यंत पोहोचलेल्या या टूरचे आयोजन ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान लोणावळामधील १९ डिग्री नॉर्थ येथे करण्यात आले होते. यावेळी लॅण्ड रोव्हरचालकांनी ऑफरोड ड्रायव्हिंगचा थरार अनुभवला