|| राजेंद्र श्रीकृष्ण भट

पिवळ्या, लिंबासारख्या रंगाच्या, ३-४ सेंटिमीटर आकाराच्या या तजेलदार फुलांमध्ये भरपूर पुष्परस असतो. त्यामुळे भुंगे आणि अन्य कीटकांना मेजवानीच मिळते. या कीटकांमुळे पक्ष्यांनादेखील अन्न मिळते. नंतर या झाडाला लांबलचक शेंगा येतात. त्या पिकून मातकट रंग घेतात. त्यात चिकट गराचे आडवे कप्पे असतात. प्रत्येक कप्प्यात एक बी असते. शेंगा पावसाळ्यात गळून पडतात. या शेंगांतील गर औषधी असतो. सारक म्हणजे पोट साफ करण्यासाठी उपयुक्त ठरतो. जंगलात अनेक प्राणी या शेंगा खातात. गुरे मात्र हे झाड खात नाहीत. बहाव्याची वाढ वेगाने होते. चार-पाच वर्षांत शेंगा लागतात. आधुनिक औषधशास्त्रातही बहावा महत्त्वाचा मानला जातो. अँटिऑक्सिडंट, अँटिइन्फेमेटरी, हिपॅटोप्रोटेक्टिव्ह, अँटिटय़ुमरस म्हणून बहावा ओळखला जातो. जखम बरी करण्यास, बुरशीजन्य आजार बरे करण्यास आणि गर्भनिरोधक म्हणून बहावा ओळखला जातो. विविध त्वचारोग, कफ, रक्तपित्त, गंडमाळा, हगवण, स्त्रियांचे आजार यावरही बहावा उपयुक्त ठरतो. बहाव्याला संस्कृतमध्ये ‘अरग्वध’ म्हणजेच रोगांचा नाश करणारा म्हणून ओळखले जाते. अन्य अनेक फळांपेक्षा बहाव्याच्या गरात जास्त कॅल्शियम असते. फुलांच्या झुबक्याची भाजी आणि शेंगांची बर्फी केली जाते.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

केरळमध्ये एप्रिल महिन्यात वर्षांरंभ होतो. या सणात बहाव्याच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. या दिवशी गृहिणी विशुकन्नी सजवतात. त्यात विविध धान्ये, फळे आणि बहाव्याची फुले असलेली परडी देवासमोर ठेवली जाते. या दिवशी बहाव्याचे दर्शन शुभ मानले जाते. हे झाड लावण्यास आणि सांभाळण्यास अगदी सोपे आहे. विस्तार मर्यादित असतो आणि रोग जवळपास लागतच नाहीत.