News Flash

खाद्यवारसा : कांद्याचे लोणचे

पातेल्यात तेल गरम करा, थोडे कोमट असताना त्यात मोहरी डाळ घाला.

कांद्याचे लोणचे

ज्योती चौधरी-मलिक

साहित्य :

१० छोटे छोटे कांदे, अर्धी वाटी मोहरी डाळ, १ वाटी तेल, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, प्रत्येकी एक चमचा जिरेपूड, धणेपूड, मेथीदाणा, अर्धी वाटी कैरीचा किस, चिमूटभर साखर.

कृती :

कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत (मसाल्याच्या वांग्यासारखे.) कैरीच्या किसात हळद, तिखट, मीठ, मेथी भाजून त्याची पूड, जिरेपूड, धणेपूड, साखर एकत्र करावे. हा मसाला कांद्यात भरावा. पातेल्यात तेल गरम करा, थोडे कोमट असताना त्यात मोहरी डाळ घाला. तेल थंड झाल्यावर त्यातच भरलेले कांदे सोडा. कोरडय़ा बरणीत लोणचे भरून दादरा बांधा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 2:55 am

Web Title: onion pickle recipe for loksatta readers
Next Stories
1 सुंदर माझं घर : खोक्यातले कोडे
2 शहरशेती : घरात झाडे कशासाठी?
3 ‘डेव्हलपर्स ऑप्शन’चे गूढ
Just Now!
X