|| दीपा पाटील

साहित्य

२ मोठी पापलेटं, २ वाटी कोलम भात, ४ मोठे कांदे, २ लहान टोमॅटो, २ मोठे चमचे वाटलेली लाल मिरची, २ मोठे चमचे आलं-लसूण वाटण, १ चमचा हळद, २ मोठे चमचे बिर्याणी मसाला, ४ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा लिंबूरस, मीठ

कृती

पापलेटचे तुकडे करून लिंबूरस, हळद, मीठ लावून १५ मिनिटे ठेवा. पातेल्यात तेल गरम करा. त्यात कांदा लाल करा. नंतर त्यात आलं-लसूण वाटण, टोमॅटो, लाल मिरची वाटण, बिर्याणी मसाला टाका. थोडे मीठ टाकून रस्सा  शिजवून घ्या. नंतर त्यावर पापलेट तुकडे ठेवून वरून भात पसरवा आणि झाकण ठेवून एक वाफ आणा.