संपदा जोगळेकर-कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रंगभूमीवर कलाकार आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका पार पाडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे ताण येणे स्वाभाविक आहे. ताण म्हणजे आपल्यासमोर निर्माण झालेले प्रश्न. त्यामुळे ज्या प्रश्नांमुळे ताण येतो त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे आलेला ताण अगदी सहज हलका होतो. खरे म्हणजे आपण स्वत: सकारात्मक राहिलो तर कोणताही ताण येत नाही.

कुटुंबात एक किंवा दोन मुले असल्याने पालक त्यांचे लाड करतात. त्यामुळे नकार पचविण्याची सवय या मुलांना नसते. यातून ताण येण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. घरापासून ते दारापर्यंत नकार पचविणे जमत नाही. ताण आल्यानंतर आपल्या आवडीचे काम हाती घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. मी कलाकार असले तरी एक गृहिणीही आहे.

मला घर स्वच्छ करण्याची प्रचंड आवड असल्याने वेळ ठरवून घेऊन घराची स्वच्छता करते. मला स्वयंपाक करायलाही आवडतो. ताणमुक्तीसाठी मी संगीताचा किंवा दूरचित्रवाणी पाहण्याचा पर्याय कधीही निवडला नाही. घरच्यांबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारणे, स्वत:मध्ये एखाद्या कलेची जपणूक करणे या सर्वच गोष्टी ताणमुक्तीसाठी फायदेशीर ठरतात.

मनात येणारे विचार कागदावर उतरविण्यानेही ताण हलका होण्यास मदतच होते. ज्या प्रश्नांमुळे ताण येतो त्याचे उत्तर मिळेपर्यंत धीर धरणे, त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास, विचार करणे महत्त्वाचे आहे. ताण घेण्याची सवय लावून घेऊ नये.

शब्दांकन -भाग्यश्री प्रधान

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sampada jogalekar kulkarni article abot stress
First published on: 23-08-2018 at 02:34 IST