News Flash

घरातलं विज्ञान : तापमापी

वस्तू किती गरम किंवा थंड हे जेव्हा मोजण्याची गरज भासू लागली, तेव्हा तापमापीच्या शोधाचे प्रयत्न सुरू झाले.

(संग्रहित छायाचित्र)

सुधा मोघे-सोमणी

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

विज्ञान जसजसे प्रगत होत गेले तसे अनेक नवनवीन शोध लागले. त्यातील दैनंदिन जीवन व उद्योग क्षेत्रातदेखील महत्त्वाचा ठरलेला शोध म्हणजे तापमापी.

वस्तू किती गरम किंवा थंड हे जेव्हा मोजण्याची गरज भासू लागली, तेव्हा तापमापीच्या शोधाचे प्रयत्न सुरू झाले. गॅलिलिओ सह अनेक शास्त्रज्ञांनी यासाठी संशोधन सुरू केले पण तापमापीचा शोध डॅनियल फॅरनहाइट याने १७०९ मध्ये लावला.

तापमान मोजण्याकरिता अशा द्रव पदार्थाची गरज होती ज्याचा कोणता तरी गुणधर्म तापमान बदलले की त्या प्रमाणात बदलेल. अशी पहिली तापमापी फॅरनहाइटने १७०९ मध्ये अल्कोहोल  वापरून तयार केली. अल्कोहोलचे तापमान वाढले की तो प्रसरण पावतो व किती प्रसरण पावला त्यावरून त्याचे तापमान किती ते कळते.

अल्कोहोल तापमापी -११७ ते ७८.५ अंश सेल्सियसपर्यंतचे तापमान दर्शवते. परंतु, त्याहून उच्च तापमान मोजण्यासाठी याचा वापर करता येत नाही. कारण अल्कोहोल वायुरूप अवस्थेत लवकर विरून जातो. यावर उपाय म्हणून फॅरनहाइटनेच १९१४मध्ये पाऱ्याचा समावेश असलेली तापमापी बनवली.

पाऱ्याचा वितलनांक – ३८.८  व उत्कलनांक ३५६.७३ अंश सेल्सियस इतका असल्याने धातू असूनसुद्धा तो कक्ष तापमानात द्रवरूप असतो. वितलनांक ३५६.७३ अंश सेल्सियस असल्यामुळे उच्च तापमान मोजायला पाऱ्याची व कमी तापमान मोजायला अल्कोहलची तापमापी वापरली जाते. ज्वरमापी ही पारा वापरून तयार करतात. पारा धातू असला तरी इतर धातूंप्रमाणे उष्णतेचा सुवाहक नाही. उष्णतेच्या संपर्कात द्रवरूप पारा प्रसरण पावतो व याच गुणधर्माचा वापर तापमापी करते. पातळ काचेच्या बल्बमध्ये पारा असतो. गरम वस्तूच्या संपर्कात हा बल्ब ठेवल्यास पाऱ्याचे प्रसरण होते. या बल्बला एक काचेची बारीक नळी जोडलेली असते, ज्यावर तापमान अंकित केलेले असते. पारा चांदीप्रमाणे चकाकतो व काचेच्या नळीत पटकन दिसून येतो. अल्कोहोल रंगहीन असतो म्हणून त्यात रंग मिसळतात. प्रसरण पावून पारा/अल्कोहोल ज्या अंकित केलेल्या तापमानापर्यंत चढतो तेच त्या गरम वस्तूचे तापमान असते. ज्वरमापीमध्ये तापमान शून्य फॅरनहाइटमध्येदेखील अंकित केलेले असते. ‘केशाकर्षण’ या लेखात आपण बघितले होते की द्रव पदार्थ केशिकेतून वर चढतो. पारा असा वैशिष्टय़पूर्ण द्रव आहे. जो केशिकेतून वर न चढता खाली उतरतो. याचे कारण म्हणजे पाऱ्याच्या अणूंमध्ये असलेले ससंगीय (Cohesive) बल  हे काच व पाऱ्यामधील असंगीय बलापेक्षा (Adhesive) अधिक तीव्र आहे. तसेच पाऱ्याचा पृष्ठीय ताण खूप जास्त आहे. त्यामुळे तो काचेला चिकटत ही नाही व वरदेखील चढत नाही. या तापमापीचा वैद्यकीय क्षेत्रात खूप उपयोग झाला. ताप किती चढतो व तो किती वेळाने उतरतो हे कळल्यामुळे डॉक्टर्सना रोगनिदान करून औषधोपचार करणे सोपे झाले आहे.

पारा विषारी आहे, त्यामुळे तो हाताळणे धोक्याचे आहे. यासाठी आज बाजारात डिजिटल तापमापी / ज्वरमापी उपलब्ध आहेत. यात पारा न वापरता विद्युत धारेच्या विशेष गुणधर्माचा वापर केला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2019 12:28 am

Web Title: thermometer home science abn 97
Next Stories
1 टेस्टी टिफिन : सोप्पे ग्रिल चिकन आणि पिटा
2 ऑफ द फिल्ड : कसोटीतील जिगरबाज..
3 आम्ही शेतकरी
Just Now!
X