आज आपण थेराबँडच्या साहाय्याने मनगटाच्या मागील बाजूस असलेले स्नायू आणि खांद्याच्या सांध्याची पुढील बाजूस असलेले स्नायू मजबूत करण्यासाठीचा व्यायाम करणार आहोत. यासाठी आपण थेराबँडचा वापर करणार आहोत.

कसे कराल?

थेराबँडचे एक टोक पायाखाली धरून ठेवा आणि दुसरे टोक एका हाताच्या बोटांभोवती गुंडाळा. सुरुवातीला थेराबँडला थोडासा ताण द्या आणि तुमचा हात किंचित पुढील बाजूस घ्या. यावेळी हाताचा कोपर आणि मनगट सरळ ठेवा. थेराबँड मात्र घट्ट पकडून ठेवा. (छायाचित्र १ पाहा)

आता थेराबँडला ताण देऊन हात आहे, त्या स्थितीत वर उचला. अशा वेळी मनगट आणि हातचा कोपर सरळ ठेवा. (छायाचित्र २ पाहा) हात ज्या स्थितीत वर नेला त्याच स्थितीत खाली आणा.

dr.abhijit@gmail.com