मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आसन आहे. या आसनामुळे मन स्थिर होऊन चंचलता दूर होते. मूळव्याध आणि लैंगिक विकारांसाठीही हे आसन लाभदायक आहे.

कृती

  • दंडासनात बसून डावा पाया दुमडून टाचेला मांडीवर घ्या.
  •   उजव्या पायाची टाच डाव्या मांडीवर आणि डाव्या पायाची टाच उजव्या मांडीवर ठेवा. मात्र टाच तळपाय, जांघा वा पोटऱ्यांमध्ये असावे.
  •   गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. दोन्ही हात ज्ञानमुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर टेकून ठेवा.
  •   पाठीचा कणा सरळ असावा. डोळे बंद करून दोन्ही भुवयांच्या मध्ये मन एकाग्र करा.