scorecardresearch

शहरशेती : वेलभाज्यांची काळजी

या आठवडय़ात आणखी काही वेलभाज्यांविषयी जाणून घेऊ. त्यांचे मांडव कसे असावेत, याचीही माहिती घेऊ.

(संग्रहित छायाचित्र)
राजेंद्र श्रीकृष्ण भट

मागील भागात आपण वेलींवर किती काळात भाज्या येऊ शकतात, त्या किती काळ उत्पादन देतात याची माहिती घेतील. या आठवडय़ात आणखी काही वेलभाज्यांविषयी जाणून घेऊ. त्यांचे मांडव कसे असावेत, याचीही माहिती घेऊ.

चवळीच्या शेंगा : चवळीच्या शेंगा ५० ते ६० दिवसांत येऊ लागतात. पुढे चार ते पाच महिने शेंगा येत राहतात.

तोंडली : तोंडलीची लागवड कटिंगपासून केली जाते. या वेली एकदा लावल्या की तीन वर्षे उत्पादन देतात. हे वेल वर्षांतून दोनदा मांडवाच्या उंचीएवढे कापावेत. जास्त पाऊस पडत असताना म्हणजे जुलै महिन्यात आणि हिवाळ्यात खूप थंडी असताना म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात वेल कापावेत. त्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात उत्पादन सुरू होते.

घेवडा वर्गीय : वाल, पावटा, डबलबी पावटा, वालवड, लायमाबिन्स, इत्यादी वेलींचे बी लावल्यानंतर, पावसाळा संपल्यावर त्याला फुले येण्यास सुरुवात होते. घेवडय़ाच्या वेलींना तीन वर्षे उत्पादन येत राहते. मांडव कपडे वाळत घालतो तसा उभा असावा. त्याची उंची साधारण खांद्याएवढी असावी.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा ( Kutumbkatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about care of vine vegetable

ताज्या बातम्या