अर्चना जोशी

सणवार सुरू झाले की साफसफाई, फराळाबरोबरच तयारी सुरू होते ती सुंदर कपडे आणि त्यावर साजेसे दागिने घेण्याची. कपडे खरेदीला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ हे दागिने शोधण्यावर जातो. नव्या कपडय़ांना साजेसे दागिने घरच्या घरीच तयार करता आले तर? चला तर, दागिने तयार करू या.

साहित्य

रंगीत कागद, क्विलिंगची सुई, हुक, चेन, गम, कात्री, पेन्सिल, कागद.

कृती

* आपल्याला हवे ते रंग ठरवा व नक्षी कागदावर रेखून घ्या.

*  नक्षीत असलेले आकार तयार करा.

*  सर्व आकार एकसारखे व्हावेत, यासाठी एका मापाच्या पट्टय़ा वापरा.

*  आकार जोडून नक्षी बनवून घ्या.

*  चित्रात दाखवल्याप्रमाणे फुलेही काढता येतील.

*  रंगीत आकार सजवा.

*  झटपट हुक जोडा कानातले तयार.

*  तिसरा आकार हुक जोडून चेनमध्ये सरकवा.

*  आपला नवीन सेट तयार.

*  वेगवेगळे आकार द्या आणि रोज नवीन नक्षीचा सेट वापरा.