वैद्य प्रभाकर शेंडय़े

drshendye@gmail.com

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

डोक्यावर औषधी द्रवाची धार सोडणे याला शिरोधारा म्हणतात. आयुर्वेद पंचकर्म व रिलॅक्सेशनसाठी सध्या शिरोधारा जास्त प्रचलित आहे. यासाठी रोगानुसार तेल, तूप, दूध, ताक, कांजी, उसाचा रस अशी वेगवेगळी औषधे वापरली जातात.

शिरोधारा विधी

* शिरोधारा शक्यतो सकाळी ७-१० मध्ये केली जाते.

* रुग्णाला शिरोधारा करण्यासाठीच्या विशेष टेबलवर झोपवले जाते.

* रुग्णाच्या डोळ्यावर गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या पट्टय़ा ठेवल्या जातात.

* कपाळ किंचित मागच्या बाजूला तिरके करून झोपवले जाते.

* कपाळापासून ४ बोटे वर शिरोधारा पात्र ठेवले जाते.

* शिरोधारा करताना शांत संगीत रुग्णाला ऐकवले जाते.

* औषध कोमट करून ते पात्रात ओतले जाते.

* धारा संपूर्ण कपाळावर सोडली जाते. शक्यतो एका जागी स्थिर न ठेवता लंबगोल अशी फिरवली जाते.

* रोग व प्रकृतीनुसार ३० मिनिटे ते १ तास ही क्रिया केली जाते.

* खाली जमा झालेले तेल पुन्हा गरम करून वापरले जाते.

* शिरोधारा झाल्यानंतर टिश्यू पेपर किंवा टॉवेलने तेल व्यवस्थित पुसून घेतले जाते.

शिरोधारा करताना घ्यावयाची काळजी –

* कानात कापसाचे बोळे, डोक्याला टोपी, नाकाला रुमाल बांधून मग घरी जावे.

* केस धुवायला आवळ्याचा काढा वापरावा आणि नंतर केस कोरडे ठेवण्याची खबरदारी घ्यावी.

* शिरोधारेनंतर प्रसन्न मनाने विश्रांती घ्यावी.

* जिभेवर ताबा ठेवावा व पथ्यकर भोजन करावे.

शिरोधारेचे उपयोग

*  तैल धारा- केसांचे आजार, निद्रानाश, डोकेदुखी, वाताचे विकार, मानसिक ताणतणाव, भीती, उदासीनता या विकारांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त

*  तक्रधारा- औषधी काढा करून त्यामध्ये औषधी सिद्ध ताक मिसळून त्याने डोक्यावर धार धरली जाते. केस पांढरे होणे, शिर:शूल, कर्णरोग, डोक्यात होणारा कोंडा, त्वचाविकार या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त.