अपाचे आरटीआर २०० एफआय इ१००

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुचाकी व तीनचाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएसने टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० एफआय इ१०० ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर करून आपल्या कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये अपाचे आरटीआर २०० ४व्ही इथेनॉल ची संकल्पना मांडली होती. अपाचे हे टीव्हीएसचे सर्वात मुख्य वाहन आहे. आत्तापर्यंत ३५ लाखांहून अधिक अपाचेची विक्री जगभरात झाली आहे. दुचाकी वाहन उद्योगक्षेत्र विद्युत, हायब्रीड व पर्यायी इंधन अशा सर्व विभागांमध्ये हरित व चिरस्थायी आधुनिक सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करत आहे. टीव्हीएस मोटर कंपनी असे मानते की, इथेनॉलवर चालणारी उत्पादने हा आमच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. एथॅनॉलच्या बाबतीत ट्रॅजिशनमध्ये सहज अनुकूलता आहे. त्याचप्रमाणे गाडीची कामगिरी कोणतीही तडजोड ग्राहकांना करावी लागणार नाही यामागची प्रमुख कारणे आहेत.  ही गाडी भारतात हरित भवितव्य घडवण्याचा ट्रेंड सुरु करेल, असे टीव्हीएस कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले.या मोटारसायकलवर इथेनॉल लोगोसह हिरव्या रंगसंगतीचे ग्राफिक आहे. यामध्ये ट्वीन-स्प्रे-ट्वीन-पोर्ट ईएफआय तंत्रज्ञान आहे. गाडी चालवण्यात अधिक चांगली सुलभता, वेगवान थ्रोटल रिस्पॉन्स व उत्सर्जन पातळीमधील घट ही याची खासियत आहे. विविध प्रकारच्या स्थितींमध्ये ही गाडी अधिक चांगली शक्ती व अधिक चांगली कामगिरी देते, असा कंपनीचा दावा आहे. मोटरसायकलची शक्ती ८५०० आरपीएमला २१ पीएस व टॉर्क ७००० आरपीएमला १८.१ एनएम आहे. ही गाडी दर तासाला १२९ किमी इतका सर्वात जास्त वेग गाठू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ही विशेष गाडी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटकमध्ये १,२०,००० रुपये या आकर्षक किमतीला उपलब्ध करवून देण्यात येईल.इथेनॉल का?इथेनॉलचे उत्पादन नूतनीकरणीय प्लान्ट स्रेतांकरवी देशात केले जाते. हे विषारी नसते, बायोडिग्रेडेबल आहे, हाताळणी, साठवण आणि वाहतूक या सर्व दृष्टीने सुरक्षित आहे. हे ऑक्सिजनेटेड इंधन असून यामध्ये प्राणवायूचे प्रमाण ३५% आहे. त्यामुळे इथेनॉल जळत असताना त्यातून नायट्रोजन ऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते. याशिवाय इथेनॉल कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जन, पर्टिक्युलेट मॅटर व सल्फरडायऑक्साइड यांचे प्रमाण कमी करण्यात देखील मदत करते. इंधन म्हणून एथॅनॉलच्या वापरामुळे पेट्रोलियम आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Countrys first bike running on ethanol apache rtr 200 fie 100 abn
First published on: 20-07-2019 at 00:14 IST