आजची सॅलडची पाककृती अगदी सोप्पी आहे. पण खूप चविष्टही. खरेतर सॅलड म्हटल्यावर डाएटशी इमान राखून केलेली पाककृती असं काहीसं आपल्याला वाटतं. पण या पाककृतीचं तसं नाही. अगदी बिनधास्त चीजचा वगैरे वापर केलाय यामध्ये. मग द्या कधीतरी तुमच्या डाएटला सुट्टी आणि करा जिभेचे लाड!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृती

सर्वात आधी अंजीर धुऊन त्याचे प्रत्येकी ४ भाग करून घ्यावेत. त्यावर क्रीम चीज घालावे. त्यावर थोडीशी मिरपूड भुरभुरावी. आता ओटीजीच्या (ओव्हन) ग्रील मोडमध्ये ३-४ मिनिटे बेक करावे. तुमचे अंजीर आणि चीज सॅलड तयार झाले. आता खायला देताना वरून चॉकलेट सॉस शिंपडा. हे यम्मी सॅलड खायला तय्यार!

साहित्य

५-६ अंजीर, ५० ग्रॅम्स क्रीम चीज, मिरपूड, चॉकलेट सॉस वरून शिंपडण्याकरिता

nilesh@chefneel.com

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Figs cream cheese salad
First published on: 24-03-2018 at 01:25 IST