छिद्र नसलेल्या, छोटय़ा बादलीत, चिखलात वेखंडाचे कंद लावतात. दीड-दोन फूट उंचीची, चपटी, रुंद पात्यांची झाडे छानच दिसतात!  वनस्पतीच्या पानांस व कंदास सुगंध येतो, तो थोडय़ाफार प्रमाणात आजूबाजूला पसरतो. वेखंडाचे अनेक औषधी उपयोग आहेत. याच्या वासाने पिसवा पळतात, घरात पिसवा झाल्यास वेखंड ठेवावे. याच्या कंदाच्या सुगंधाने स्मरणशक्ती वाढते. वेखंडाच्या काढय़ाने घशाचा त्रास कमी होतो. छोटा तुकडा तोंडात ठेवल्यास सुका/कोरडा खोकला व वारंवार तहान लागणे कमी होते. वेखंड मेंदूस व मज्जातंतूंसाठी उत्तेजक असते. तसेच ते कृमीनाशकही आहे. खूप श्रम झाल्यामुळे, पावसात भिजल्यामुळे होणारी अंगदुखी वेखंड चूर्ण शरीरावर चोळल्याने कमी होते. बागेतील वेखंडाच्या अस्तित्वामुळे बाकीच्या झाडांवरील कीड कमी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गवती चहा ही घरात आवश्यक वनस्पती आहे. सर्दी, मलेरियाच्या तापात ही उपयुक्त ठरते. याच्या गाठी/गड्डे असतात आणि त्यांच्या फुटव्यांपासून लागवड करतात. वर्षभरात परत अनेक रोपे त्याभोवती तयार होतात. थंडी कमी झाल्यावर रोपे वेगळी करून परत लागवड करावी म्हणजे पावसाळ्यात व हिवाळ्यात गवती चहाची पाने मिळतात. रोपे नीट निवडून घ्यावीत कारण ओडोमॉसची पानेही गवती चहासारखीच दिसतात. कुंडीत नवीन रोपे लावताना मातीमध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशीनाशक पावडर एक चमचाभर मिसळावी.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green tea
First published on: 13-04-2018 at 02:27 IST