स्वयंपाकघरातील कामे सोपी करणाऱ्या अनेक उपकरणांमधील एक मायक्रोवेव्ह ओव्हन. अनेक वेळखाऊ रेसिपींना कमीत कमी वेळेत करण्याची कसब या यंत्राजवळ आहे. पिझ्झा, केक आणि अन्य बेकरीच्या पदार्थाशिवाय जेवण गरम करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या यंत्राची योग्य प्रकार निगा राखली पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनचे आयुर्मान वाढवायचे असेल, तर तो नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. ओव्हनमध्ये पदार्थाचे जळलेले तुकडे तसेच राहिले तर ओव्हन नादुरुस्त होऊ शकतो. वापर झाल्यानंतर मायक्रोवेव्ह ओव्हन पाण्याने आणि मायक्रोवेव्ह क्लीनरने स्वच्छ करावे.
  • काही पदार्थाचे जळलेले तुकडे मायक्रोवेव्ह ओव्हनच्या आतील बाजूस चिकटून राहतात. अशा वेळी एक कपभर पाणी ६० ते ९० सेकंदांसाठी ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर हे तुकडे सैल होतात आणि मग ते साफ करता येतात.
  • मायक्रोवेव्हमध्ये कोणतेही भांडे ठेवू नका. धातूची भांडी जर मायक्रोवेव्हमध्ये ठेवली तर त्यात बिघाड होऊ शकतो. अ‍ॅल्युमिनिअम फॉइल (कागद), चांदी आणि सोन्याचा मुलामा असलेली भांडीही वापरू नये. मायक्रोवेव्ह ओव्हनसाठी लागणाऱ्या भांडय़ांचाच वापर करावा. शक्यतो प्लास्टिक, काच, सिरॅमिकची भांडी वापरावी.
  • मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर करताना दरवाजा बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोक हाताचा वापर न करता हाताच्या कोपराने दरवाजा बंद करतात. अशा वेळी दरवाजा पूर्णपणे बंद झालेला नसतो. दरवाजा उघडतानाही वीजपुरवठा बंद न करता दरवाजा उघडला जातो. हे धोक्याचे आहे.
  • ओव्हनच्या आतमध्ये काहीही नसताना त्याचा वीजपुरवठा सुरू ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे ओव्हनमध्ये बिघाड होऊ शकतो.
  • ओव्हनमध्ये केक, कुकी, टोस्ट ब्रेड किंवा अन्य पदार्थ बनवताना योग्य तापमानाचा वापर करावा. जेव्हा तुम्ही बेक करत असाल तर त्या सेटिंगचा वापर करावा. बेकिंग, टोस्टिंग, ग्रिलिंग किंवा इतर पद्धतीचा वापर करताना ओव्हनची सेटिंग त्याप्रमाणे बदलून घ्या.
  • तुमच्या ओव्हनची वजन क्षमता (वेट कपॅसिटी) जाणून घ्या. त्यानुसारच त्याचा वापर करावा. क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे पदार्थ ठेवल्यास ओव्हन नादुरुस्त होऊ शकतो.
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handling of microwave oven
First published on: 01-02-2018 at 00:26 IST