देशाबाहेर किंवा देशांतर्गत पर्यटन करताना बरेचजण विमान प्रवासाला पसंती देतात. पण विमान प्रवासाची अनेकांना धास्ती असते. त्यातूनही पहिलाच विमान प्रवास असेल मग तर अधिकच गोंधळ उडतो. हा प्रवास सुखद होण्यासाठी काही टिप्स-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • संपूर्ण माहिती मिळवा – विमान प्रवासाला जाताना हवाई मार्गाची पूर्ण माहिती मिळवा. जिथून प्रवास सुरू करायचा आहे ते विमानतळ, जिथे उतरायचं ते विमानतळ याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. फ्लाइटची वेळ, बोर्डिगची वेळ याची इत्थंभूत माहिती असेल तर मग प्रवासाची चिंता कमी होते.
  • वेळेचं नियोजन करा – आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणच्या किमान ३ ते ४ तास आधी विमानतळावर पोहोचणं कधीही चांगलं. लांब रांग आणि गर्दी यामुळे खूप वेळ जाऊ शकतो. उशीर झाल्यामुळे मनावरचा ताण वाढू शकतो. चेक इन वेळेत केल्यानंतर तुम्ही वेटिंग रूममध्ये विश्रांती घेऊ शकता. वेळेचं योग्य नियोजन केल्यास प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो.
  • जास्त सामान नकोच! – प्रवासाच्या उत्साहामध्ये नेहमी खूप सामान घेतलं जातं. विमान प्रवास करताना बॅग चेकिंगच्या वेळी जास्तीच्या सामानामुळे नामुष्की ओढवू शकते. जास्त सामानामुळे जड बॅग बाळगण्याचा त्रास तर होतोच शिवाय तुम्हाला रांगेत जास्त वेळ लागल्यामुळे इतर प्रवाशांची चिडचिड होते. त्यामुळे स्मार्ट पॅकिंग करा.
  • तंत्रस्नेही व्हा – आपल्या संगणकात किंवा मोबाइलमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करून ठेवल्यास एका क्लिकवर तिकीट बुक करू शकता. शेवटच्या क्षणी उडणारी तारांबळ टाळण्यासाठी आगाऊ बुकिंग करा. सोयीची सीट आणि आवडीचं जेवणही बुक करून प्रवासाचा आनंद वाढवा.
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My first plane journey
First published on: 23-02-2018 at 02:16 IST