या आसनात दोन्ही हातांवर शरीर तोलले जाते. या आसनामुळे मनगट, हात, खांदे, पाठ आणि पाठीचा कणा मजबूत होतो. पाय आणि कंबरेलाही ताण बसल्याने तेथील स्नायूंनाही बळकटी मिळते. श्वसन संस्थाही सुधारते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृती :

* दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करत सरळ पुढे ताठ करून बसूया. पाठीचा कणा ताठ असू द्या.

* दोन्ही हात कंबरेच्या किंवा खांद्याच्या रेषेत जमिनीवर ठेवा. बोटे बाहेरच्या बाजूला असू द्या. हात ताठ.

* मागे झुकून शरीराचे वजन हातांवर टाका.

* गुडघे ताठ ठेवा. पायाचे तळवे जमिनीला चिकटवा. आता डोके जमिनीकडे सैल सोडून द्या.

* अंतिम स्थितीत स्थिर राहून श्वसन सुरू ठेवा.

* श्वास सोडत आसन हळूहळू सोडा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purvottanasana upward plank pose in yoga ziya
First published on: 16-07-2019 at 03:43 IST