आरोग्यदायी आहार : - डॉ. सारिका सातव साहित्य फुटाण्याची डाळ- १ वाटी ल्ल साखर- अर्धा वाटी ल्ल वेलची पावडर- अर्धा चमचा जायफळ पावडर- पाव चमचा ल्ल काजू- १० ते १२ ल्ल बदाम- पाच ते सहा ल्ल मनुके- १० तूप- पाव वाटी कृती फुटाण्याची डाळ किंचित गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. ती पावडर चाळून घ्यावी. साखर बारीक करून त्याच वेलची पावडर व जायफळ पावडर मिसळावी. बदाम, काजू तुपात तळून बारीक करून घ्यावे. बदाम तुपात तळून बाजूला ठेवून द्यावे. फुटाण्याच्या डाळीची पावडर, साखर, बदाम, काजू पावडर एकत्र मिसळावी. गॅसवर तूप पातळ करून हे मिश्रण व मनुके एकत्र करून दोन ते तीन मिनिटे चांगले हलवावे. थंड झाल्यावर लाडू वळवावेत. वैशिष्टय़े या लाडूमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. लोह, जीवनसत्त्व ई उत्तम प्रमाणात. लोहाची कमतरता असणाऱ्यांसाठी फायदेशीर.