खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंच्या बळकटीसाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे. खांद्याच्या मागील बाजूस ‘पोस्टेरिअर डेल्टॉइड मसल’ हा स्नायू असतो. हा व्यायाम केल्याने हा स्नायू बळकट होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसे कराल?

* भिंतीकडे पाठ करून उभे राहा. मात्र भिंत आणि तुमच्यामधील अंतर किमान १० इंच असावे.

*  हात पाठीमागे भिंतीवर टेकवा.

*  आता खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंचा वापर करत पाठ भिंतीच्या बाजूला न्या.

*  पाठ भिंतीला टेकली तरी हरकत नाही. पाय मात्र आहे त्याच जागेवर पाहिजेत.

*  असे किमान १० वेळा करा. काही दिवसांनी संख्या वाढवत न्या.

– डॉ. अभिजीत जोशी dr.abhijit@gmail.com

 

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reverse wall push ups
First published on: 28-02-2018 at 03:31 IST