बाजारात नवे काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ओकिनावातर्फे इलेक्ट्रिक स्कूटर ‘क्रूझर’चे अनावरण :- भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला अनुसरून इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणारी भारतीय कंपनी ओकिनावाने ऑटो एक्स्पो २०२० मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचा आकर्षक पोर्टफोलिओ दाखवला. ओकिनावाच्या प्रोटोटाइप मॅक्झी-स्कूटर ‘क्रूझर’चे अनावरण केले.

या गाडीत ४ केडब्ल्यूएच लिथियम आयन, डिटॅचेबल बॅटरी आहे, जी युजर्सना सोयीस्कर चाìजगची खात्री देते. या स्कूटरसोबत हाय स्पीड चार्जर येतो. हा चार्जर २ ते ३ तासांमध्ये बॅटरीला पूर्ण चार्ज करते, जे या स्कूटरचे अद्वितीय वैशिष्टय़ आहे. ही स्कूटर प्रति तास १०० किमीची उच्च गती प्राप्त करू शकते आणि एका चार्जमध्ये १२० किमीहून अधिक अंतर पार करू शकते. रॉयल एनफिल्ड लवकरच भारतात ५०० यूसीई (यूनिट कन्स्ट्रक्शन इंजिन) रेंज सादर करणार आहे. एप्रिल २०२० मध्ये लागू होणारी बीएस-६ एमिशन नॉम्र्सच्या आगोदर कंपनीची बुलेट-५००, क्लासिक-५०० आणि थंडरबर्ड-५०० च्या ट्रिब्यूट ब्लॅक एडिशनसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. खरं तर ही क्लासिक ५००ची मर्यादित एडिशन आहे. हिची विक्री १० फेब्रुवारी २०२०च्या दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होणार आहे. क्लासिक-५०० ट्रिब्यूट ही एडिशन कंपनीचे शेवटचे मॉडेल असेल जे ४९९सीसी आयवायझेड सिंगल सिलिंडर इंजिन सोबत सादर होणार आहे. या मॉडेलची निर्मिती व विक्री मर्यादित असणार आहे. विशेष म्हणजे रॉयल एनफिल्ड ३१ मार्चपासून ५०० ही दुचाकी रेंज बंद करणार असून नवी दमदार ६५० ही रेंज ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield classic akp
First published on: 08-02-2020 at 00:15 IST