अक्षय देवलकर – आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यात ताण हा कोणाला नसतो? तो प्रत्येकालाच असतो. ज्याला ताण नाही असा कोणताच व्यक्ती या भूतलावर सापडणार नाही आणि जो व्यक्ती त्याचा ताण दूर करण्यासाठी काहीच करत नाही त्याला माणूस म्हणता येणार नाही. कारण ताण हा दूर करण्याचीच गोष्ट आहे. तो दीर्घकाळ कोणीही व्यक्ती आपल्यासोबत बाळगत नाही. मी एक खेळाडू आहे. बॅडमिंटन खेळताना सजग असणे महत्त्वाचे असते.  खेळाडूच्या दिशेने बॅडमिंटन कॉर्क हा अवघ्या काही सेकंदांत स्वत:च्या बॅटवर झेलून प्रतिस्पध्र्याकडे चकवेगिरी करून पाठवायचा असतो. त्या वेळेस खेळाडूचे लक्ष पूर्णपणे त्याच्या खेळाकडे असणे गरजेचे असते. मात्र कॉर्क व्यवस्थित झेलता आला नाही तर स्पर्धकाचे नुकसान होते. अशा वेळेस बॅडमिंटन खेळाडूवर म्हणून प्रचंड ताण येतो. कोणत्याही खेळाडूसाठी त्या क्षणाचा पुरेपूर उपयोग करणे महत्त्वाचे असते. मैदानावर खेळण्याच्या अगोदर मी चिंतन करतो. मी माझी मेहनत आठवतो. मी माझ्या खेळासाठी काय काय केले आहे ते आठवतो. समोरच्या स्पर्धकापेक्षा माझा खेळ खूप चांगला होईल असा विचार करून मी स्वत:मध्येच सकारात्मक भावना आणि ऊर्जा आणतो. अनेकदा एखादा सामना हरल्यावर निराश व्हायला होते. निराश होणे हे साहजिकच आहे. मात्र ती निराशा त्या वेळेपुरतीच मर्यादित ठेवायला हवी. मी सामना हरल्यावर  सामना का हरलो याचा त्याच दिवशी व्यवस्थित अभ्यास करतो, जेणेकरून मला माझ्या उणिवा लक्षात येतात. खेळाशिवाय निरनिराळ्या प्रकारचा ताणदेखील असतो. मी कुटुंबासोबत वेळ घालवतो.

कुटुंबासोबत एकदा वेळ काढून गप्पागोष्टी करणे यासारखे ताण घालवण्याचे दुसरे कोणते माध्यम नाही असे मला वाटते. मी चित्रपट पाहतो, संगीत ऐकतो. तसेच मला माझ्या बॅडमिंटन खेळाशिवाय फुटबॉलदेखील खेळायला आवडते. फुटबॉल खेळल्यामुळे माझा बराचसा ताण हा हलका होतो.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stress management tips international badminton player akshay dewalkar
First published on: 15-03-2018 at 01:06 IST