‘कॅमन आय’ आणि ‘कॅमन आय एअर’ असे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ‘टेक्नो’ने आता ‘कॅमन आय स्काय’ हा नवीन स्मार्टफोन गेल्याच आठवडय़ात सादर केला. ५.४५ इंचाची स्क्रीन, आयपीएस डिस्प्ले, ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, १३ मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा, १६ जीबी अंतर्गत स्टोअरेज, दोन जीबी रॅम, ३०५० एमएएच क्षमतेची बॅटरी, अँड्रॉइड आठ ऑपरेटिंग सिस्टीम अशी या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. या फोनमध्ये १.२८ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर बसवण्यात आला आहे. याखेरीज डय़ुअल सिमकार्ड स्लॉट, मेमरी कार्ड स्लॉट, फिंगरप्रिंट सेन्सर, फोर जी अशा सुविधा या फोनमध्ये उपलब्ध आहेत. ‘मिडनाइट ब्लॅक’ आणि ‘शँपेन गोल्ड’ अशा दोन रंगांत हा फोन भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंमत : ७४९९ रुपये.

क्वांटमची तगडी पॉवरबँक

पॉवरबँक निर्मितीतील उत्पादनांचा विस्तार करत ‘क्वांटम’ या कंपनीने १२ हजार ५०० एमएएच क्षमतेची पॉवरबँक बाजारात आणली आहे. तीन यूएसबी पॉवर आऊटपुट आणि एलईडी इंडिकेटर असलेली ही पॉवरबँक एका वेळी तीन उपकरणे चार्ज करू शकते. ही पॉवरबँक आकाराने पातळ असल्याने ती घेऊन वावरणे कठीण आहे. यामध्ये १०वॉटचे आऊटपुट असल्याने याद्वारे झटपट चार्जिग होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

किंमत : २२९९ रुपये.

डाइवाचा २४ इंची एलईडी टीव्ही

भारतात स्वस्त दरातील स्मार्टटीव्ही आणणाऱ्या ‘डाइवा’ या नवीन बॅ्रण्डने साऊंडबार आणि बॉक्स स्पीकर असलेला पहिला छोटय़ा आकारातील टीव्ही बाजारात सादर केला आहे. २४ इंच अर्थात ६० सेमी आकाराच्या या टीव्हीमध्ये १३६६ बाय ७६८ पिक्सेलचा एचडी डिस्प्ले असून त्याचा चित्रदर्जा अतिशय सुस्पष्ट असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दोन एचडीएमआय इनपुट पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्ट असलेल्या या टीव्हीमध्येच ‘होम थिएटर’च्या दर्जाचा ध्वनी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

किंमत : ८४९९ रुपये.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tecno camon income sky
First published on: 26-04-2018 at 00:33 IST