शेफ नीलेश लिमये

मे महिना संपल्याची चाहूल लागते ती पावसाच्या आणि त्याचसोबत तोतापुरी आंब्याच्या आगमनाने. हापूस हळूहळू नाहीसा होतो आणि त्याची जागा तोतापुरी आंबा घेतो. म्हणूनच याच आंब्याचा आणि पुदिन्याचा उपयोग करून केलेले हे खास सलाड.

mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
Thane municipal corporation, Kapurbawdi Dhokali route, public appeal
ठाणे : कोंडीस कारणीभूत बंद केलेला कापूरबावडी- ढोकाळी मार्ग खुला करण्याचा निर्णय
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी

कृती  आंब्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. त्यातले अर्धे फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवा. उरलेल्याचा रस काढून घ्या. ड्रेसिंगचे सर्व साहित्य एकत्र करून छान मिसळून घ्या. सलाड खाण्याच्या आधी आंब्याच्या फोडी फ्रीजमधून काढा. त्यावर आंब्याचा रस घाला आणि ड्रेसिंग पसरा. मग ते हळुवार हातांनी एकमेकांत मिसळा. वरून सजावटीकरिता नारळाचे काप आणि भाजलेले तीळ पेरा. मस्तपैकी सलाड फस्त करा.

साहित्य : २-४ तोतापुरी आंबे

ड्रेसिंगकरिता – ५० ग्रॅम पुदिन्याची पाने वाटून घेतलेली, २ इंच आले किसलेले, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, २ चमचे लिंबुरस, चिली फ्लेक्स आवडत असतील तर, चवीसाठी सैंधव मीठ.

सजावटीसाठी : भाजलेले तीळ १ चमचा, नारळाचे काप.