अ‍ॅक्युप्रेशर ही एक चीनमधील जुनी उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये प्रेशर किंवा ठरावीक ठिकाणी दाबून रोगांवर इलाज केला जातो, त्यामुळे या उपचार पद्धतीला बिंदुदाबन उपचार पद्धती असेही म्हणतात. अ‍ॅक्यु शब्दाचा अर्थ सुई आणि प्रेशर म्हणजे दाब. सुई किंवा टोकदार वस्तूने समान, हलका दाब शरीराच्या विशिष्ट बिंदूवर देऊन रोगाचे निदान केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅक्युप्रेशर ही उपचार पद्धती ‘ऊर्जा सिद्धांत’ यावर आधारित  आहे. दबाव देण्याच्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी असलेल्या ऊर्जा स्तरावर कंपन निर्माण होते. त्यासाठी अ‍ॅक्यु बिंदूवर दाब दिला जातो. माणसाच्या शरीरात असंख्य अ‍ॅक्यु बिंदू असतात, त्यावर टोकदार वस्तूने दाब दिला जातो. त्यासाठी बिंदुदाबन लेखणी (जिमी), बिंदुदाबन लाटणे (रोलर) आणि अन्य काही साधनांचा वापर केला जातो. आपल्या शरीरातील विशिष्ट बिंदूंवर दाब दिल्याने कंपन आणि ऊर्जेचे तरंग तयार होतात. त्यामुळे शरीरातील वेदना दूर होतात. शरीरातील लहानसहान वेदना दूर करण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर उपयुक्त आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treatment method acupressure zws
First published on: 18-02-2020 at 03:09 IST