उन्हाळा सुरू झाला की सर्वानाच वेध लागतात ते थंड हवेच्या ठिकाणी भटकंतीचे आणि अशा ठिकाणांपैकी सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेश. पण हिमाचल प्रदेशातील सर्वच पर्यटनस्थळी संपूर्ण उन्हाळाभर हवा थंड असेलच असं नाही. बर्फात खेळायची स्वप्नं पाहिली आणि प्रत्यक्षात घामाघूम होण्याची वेळ आली असं होऊ शकतं. हे टाळण्यासाठी नियोजन योग्य असावं.

भरपूर बर्फात खेळायचं असेल तर मार्चमध्येच हिमाचल गाठा. ऑफ सिझन असल्यामुळे गर्दी कमी असते आणि हिमवृष्टी पाहण्याची संधीही मिळू शकते. एप्रिलनंतर गर्दी वाढते आणि बर्फाची चादर विरू लागते आणि कुठेतरी साचलेलं थोडंसं बर्फ पाहून समाधान मानावं लागतं. मार्चअखेरीपर्यंत जाणार असाल तर जाडजूड लोकरीचे कपडे, थर्मल, कानटोपी, हाता-पायांसाठी लोकरीचे मोजे, रेनकोट न्यावेत. एप्रिल-मे मध्ये फक्त पूर्ण बाह्यांचे कपडे आणि एखादं स्वेटशर्ट पुरेसं होतं. बिलासपूर, सोलान, कांग्रा, उना या भागांत उन्हाळ्यात तापमान बरंच वाढतं, त्याउलट चंबा, किन्नौर, कुलू, शिमला, स्पिती, डलहौसी या भागांत उन्हाळ्यातही तुलनेने थंड व आल्हाददायक वातावरण असतं.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
Suspect from Madhya Pradesh arrested in Satpur
नाशिक : मध्य प्रदेशातील संशयितास सातपूरमध्ये अटक
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
25 seats in North East are challenging for BJP
ईशान्येकडील २५ जागा भाजपसाठी आव्हानात्मक

या भागांत झॉर्बिग, पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, स्कीइंग करण्याची आणि बर्फातील अन्य थरारक खेळ खेळण्याची संधी मिळते, मात्र त्यासाठी अवाच्या सवा पैसे आकारले जातात. त्यामुळे घासाघीस करण्याचं कसब वापरावं लागेल. शिमला आणि मनालीच्या पलीकडेही हिमाचलमध्ये पाहण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. गर्दी टाळून शांतता अनुभवायची असेल, तर जरा आडवाटेवरच्या गावी राहणं उत्तम!