युनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन उपचार पद्धती आहे. युनानी औषधोपचार पद्धती ग्रीसमध्ये उत्पन्न झाली. भारतात पुरातन काळी ग्रीक नागरिकांना यवन असे म्हणत. यवनांनी पुढे आणलेल्या वैद्यकीय पद्धतीला युनानी म्हटले गेले. अरबी लोकांनी ग्रीकांची वैद्यकीय पद्धती जाणून घेतली आणि त्यात भरही घातली. त्यामुळे युनानी उपचार पद्धतीला प्रगत करण्यात मोठा वाटा अरबांचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरब व्यापाऱ्यांसोबत ही पद्धती भारतात आली आणि मोगलांच्या काळात तिचा प्रसार व भरभराट झाली. भारतीय हकिमांनी येथील स्थानिक हवामानास अनुकूल असे फेरफार करून या उपचार पद्धतीला देशी रूप दिले. युनानी उपचार पद्धतीत औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. आरोग्याच्या देखभालीसाठी ही तत्त्वे महत्त्वाची असतात. अल्- अरकान (मूलद्रव्ये), अल्- मिजाज (प्रवृत्ती), अल्- अखलात (शारीरिक द्रव्ये), अल्- आझा (अवयव), अल्- अखाह (जीवनावश्यक स्फूर्ती), अल्- कवा (शक्ती), अल्- अफआल (शारीरिक क्रिया) ही सात तत्त्वे आहेत. या तत्त्वानुसार औषधोपचार केला जातो.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unani medicine zws
First published on: 21-01-2020 at 03:38 IST