|| शहरशेती : राजेंद्र भट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तांबडय़ा भोपळ्याची फळे मोठी असतात आणि खोड पोकळ असते. यात अर्ध्या किलोपासून २०-२५ किलोपर्यंतची फळे येतात. याला काशीफळ किंवा डांगर असेही म्हणतात. फळाचा बाह्य़ आकार मृदुंगासारखा गोल, चपटा, कंगोरेदार असतो. बाह्य़ रंग पिवळा, केशरी, हिरवा, काळपट हिरवा, पांढरा यापैकी कोणताही असतो, तर आतील गर सामान्यपणे पिवळा, केशरी असतो. वेलाची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी शेंडे तोडतात. त्यामुळे बगलफुटी वाढतात आणि वेलाला जास्त फांद्या येऊन फळांची संख्याही वाढते. खुडलेल्या कोवळ्या शेंडय़ांची भाजी करतात. या वेलाची फुले सकाळी आठच्या सुमारास बंद होतात. यात परागीभवन कीटकांमार्फत होते. कीटक थंड रक्ताचे असतात. त्यामुळे थंडीत परागीभवन होत नाही. आपण कृत्रिम परागीभवन करू शकतो. याची नर आणि मादी फुले वेगळी दिसतात. मादीफुलाच्या मागे छोटेसे फळ दिसते, तर नर फुलाच्या मधोमध परागदांडी असते. या दांडीभोवती चित्रकलेचा ब्रश फिरवावा. परागकण ब्रशला चिकटतात. मादी फुलाच्या मध्यभागी ओव्हरी असते. तिथे तो ब्रश फिरवला की परागीवहन होते. हे कृत्रिम परागीभवन सकाळी आठच्या आधी करणे आवश्यक असते. भोपळ्याच्या नर फुलांची भाजी आणि भजी करतात. या पिकाला फळमाशीचा त्रास होतो. नियंत्रणासाठी फळमाशीचा सापळा लावावा. अर्का सूर्यमुखी आणि पुसा विश्वास या चांगल्या प्रजाती आहेत.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetables fruits pumpkin akp
First published on: 15-11-2019 at 02:33 IST