अ‍ॅडव्होकेट सुरेश पटवर्धन, कल्याण

करोनाच्या प्रादुर्भावामुळे बाहेर जाण्यावर निर्बंध सध्या सर्वानी जपले आहेत. कोर्टाच्या कामकाजाच्या वेळादेखील अर्ध्या वर आणल्या आहेत. अशा वेळी सध्या मिळत असलेल्या जास्त वेळेचा सदुपयोग करण्याची वेगळी कल्पना मनात आली. मला लहानपणापासूनच आई-वडिलांनी वाचनाची आवड लावली आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच एखादे पुस्तक वाचल्यावर ते आवडले तर विकत घेऊन आपल्या संग्रहात ठेवण्याची सवय अंगीकारल्यामुळे माझ्या खासगी संग्रहात चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवरली सुमारे हजारभर तरी पुस्तके आहेत. सध्या मिळत असलेल्या वेळेत माझ्या संग्रहात असलेल्या सगळ्या पुस्तकांची पुन्हा एकदा यादी करण्याचे काम सुरू केले आहे. याआधी वाचलेल्या चांगल्या चांगल्या पुस्तकांचे वाचन पुन्हा सुरू केले आहे. इमारतींमधल्या तसेच परिचितांना माझ्या संग्रहात असलेल्या पुस्तकांचा लाभ वाचनासाठी करून देण्याचा मानस मी अनेकांजवळ व्यक्त केला आहे.

जुन्या पुस्तकांचा नव्याने आस्वादल्ल  गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर, मुंबई</strong>

संगणकासमोर बसले आणि आंतरजालावर कोलंबसाचे गर्वगीत आठवत मुशाफिरी सुरू झाली की काळ पडद्याच्या एका कोपऱ्यात तोंड एवढेसे करून लपून बसतो. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे, नव्हे पुस्तके वाट पाहत असतात. ‘काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमतां’ हे आमच्या मनावर इतके ठसले की विचारू नका. संगणकपूर्व काळात आम्ही स्वत:ला धीमतांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भराभर आणि भाराभर इंग्लिश पुस्तके खरेदी करून ठेवली आहेत. वीज गेली किंवा संगणक बिघडला तरी आमचे काही अडत नाही. आम्ही ‘वाचतावाचता’ मोडमध्ये जातो. नुकतेच कॅथरीन हेपबर्नचे साधार आणि अभ्यासपूर्ण चरित्र वाचून संपवले आणि बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेले गार्सन कॅनिन याचे ‘ट्रेसी अँड हेपबर्न’ पुन्हा हातात घेतले. दुसऱ्यांदा तेच पुस्तक घेतले की बहुधा भ्रमनिरास पदरी पडण्याचा धोका असतो, पण कॅनिनच्या पुस्तकाने पूर्वीइतकाच आनंद दिला. स्पेन्सर ट्रेसी, कॅथरीन हेपबर्न आणि गार्सन कॅनिन यांच्यात मी अलगद सामील झालो आणि धन्य झालो.

पाककलेचे प्रयोग

 सागर कारखानीस, लालबाग, मुंबई

मी पेशाने प्राध्यापक आहे. सोबतच खाद्यसंस्कृतीचा अभ्यासही करतो. करोनामुळे मिळालेल्या या सक्तीच्या सुट्टीत समाजमाध्यमाच्या मदतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधतो आहे. त्यांच्या अभ्यासात काही अडचणी येत असतील तर त्या ऑनलाइन सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांचा गृहपाठ तपासत आहे. पुढील शैक्षणिक वर्षांसाठी प्रश्नसंच तयार  करत आहे. सोबतच अध्यापन आराखडा (ळीूंँ्रल्लॠ स्र्’ंल्ल) तयार  करण्याचे काम सुरूच आहे.

तर दुसऱ्या बाजूला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि माझी स्वयंपाकविषयक आवड जपण्यासाठी घरात उपलब्ध साहित्याच्या आधारे एक एक पदार्थही करत आहे.  त्यातूनच मधल्या वेळेत खाण्यासाठी साजूक तुपातील रवा — नारळाचे लाडू करुन ठेवले आहेत. तसेच या काटकसरीच्या दिवसात घरातील सर्वच साहित्य काळजीपूर्वक वापरायचं असल्याने तोही विचार सतत करावा लागतो. म्हणूनच मग कांदा — बटाटा भजीला पर्याय म्हणून घरातल्याच कु ंडीत लावलेल्या ओव्याच्या पानांची भजी के ली. आमच्या आंब्याच्या झाडाला कै ऱ्याही आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा उपयोग करून रात्री उरलेल्या भाताचा कैरी भात बनवला.  एकू णच एकीकडे शिक्षक म्हणून माझ्या जबाबदाऱ्या पार पाडतो आहेच पण खवय्येगिरीची आवडही जोपासतो आहे.

दिवसातील दोन तास ‘खास मित्रांसाठी’

 राहुल दिनकर कदम, ओझर (नाशिक)

दूरचित्रवाणी, प्रसारमाध्यमे, दृक्श्राव्य यंत्र, व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठ, ट्विटरवरील तुकडय़ा जिकडे तिकडे करोना करोना चालू. या दिवसांत खास मित्रांनी खूप साथ दिली. हे खास मित्र कोण, तर भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’, गिरीश कुबेर यांचे ‘एका तेलियाने’, अच्युत गोडबोले यांचे आत्मचरित्र ‘मुसाफिर’, रवि आमले यांचे ‘रॉ- भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा’ आणि  अशी अनेक पुस्तके  आहेत.  तर मी ठरवले की यांच्यासाठी दिवसातील दोन तास द्यायचे. ‘कोसला’ वाचत असताना पांडुरंग सांगवीकर अंगात भिनल्यासारखा वाटतो तसेच ‘मुसाफिर’ वाचण्यास सुरुवात केली तर संपेपर्यंत बाजूला ठेवलेच नाही. आयआयटी, आदिवासी चळवळ, तुरुंगातील अनुभव, उद्योगविश्व तसेच सर्व सांभाळत असताना कुटुंबावरील आघात असो.. पुस्तक आपल्याला खिळवून ठेवते. ‘एका तेलियाने’ तर दोन ते तीन वेळा वाचून झाले. सौदी अरेबिया, तेलाचा इतिहास, ओपेक, ओ आ पेक, शेख अहमद झाकी यामानी, तेलाचा आंतरराष्ट्रीय संबंध अशी अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. घरात कोंडून घेण्याची वेळ आल्यावर मदतीसाठी धावून येणाऱ्या संकटमोचक या अशा ‘खास मित्रांचे’ आभार.नवा गडी नवे खेळ

सारिका वर्तक, पालघर

आम्ही पालघर तालुक्यातील शिरगाव गावी वास्तवास आहोत. सध्या करोनामुळे सर्वच जण घरी बसले आहेत. घरातील मुले कॅरम, सापशिडी, बुद्धिबळ यांसारखे बैठे खेळ खेळतही आहेत. मुलांना तेच एकसारखे खेळ खेळून कंटाळा आलेला असतो. माझ्या दोन मुलांना मी रोज एका विषयावर दहा वाक्य लिहिण्यास सांगते. विषय अगदी दैनंदिन जीवनातील असतो. अशा विषयांचा मुलांनी खास विचार केलेला नसतो. त्यांनाही अनेक प्रश्न पडलेले असतात त्याचंही निरसन होते. त्यांनी लिहिलेल्या वाक्यांवर सविस्तर चर्चा करतो. हा एक नवीनच खेळ समजून तेही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. मुलांना पत्र लिहिण्यास सांगितले आहे. मग ते पत्र आवडत्या मित्राला, शिक्षकांना, मामा, आत्या कुणालाही लिहायला सांगतो. त्यामुळे मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येतात. आज जरी भ्रमणध्वनी असले तरीही पत्र लेखनाचा वेगळा आंनद मुलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. मुलेही गुंतलेली राहतात. त्याचप्रमाणे त्यांची भाषिक कौशल्येही विकसित होण्यास मदत होते. तसेच आणखीन एक खेळ खेळलो. आपल्या घरातील असलेल्या वस्तूंची सूची बनविणे. जास्तीतजास्त वस्तूंची सूची कोण बनवितो हे पाहणे. मुलांनाही स्पर्धा खेळण्याचा आनंद मिळाला.