kalaबागेची निर्मिती आणि जोपासना परिश्रमाने करावी लागते. रोपटी लावणं, त्यांची नियमित देखभाल करणं, छाटणी करणं, रोपटय़ांना आकार देणं, किडींवर नजर ठेवणं, सुयोग्य कीटकनाशकांचा वापर करून त्यांचा वेळोवेळी बंदोबस्त करणं अशी किती तरी कामं नियमितरीत्या केली तरच देखणी आणि सुंदर बाग तयार होते. आज बागेची निर्मिती ही एक उत्तम करिअर संधी ठरत आहे. मात्र त्यासाठी या विषयातील रीतसर प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे.

असं प्रशिक्षण आणि कौशल्यं प्राप्त करून देणारा बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम नववी उत्तीर्ण असलेल्या कोणत्याही व्यक्तीला करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम कृषी महाविद्यालय, दापोली (रत्नागिरी) आणि कृषी संशोधन केंद्र,पालघर येथे शिकवला जातो.
संस्थेचा पत्ता-
अधिष्ठाता, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जिल्हा- रत्नागिरी)- ४१५७१२. वेबसाइट- http://www.dbskkv.org

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…