ग्रामीण भागामध्ये बहुधा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी मांडवावर पडवळे लोंबकळताना दिसतात. लांबलचक त्वचेवर फिकट हिरवे, चपटे-जाड, सर्पाकृती आकाराचे पडवळ असल्यामुळे इंग्रजीमध्ये त्याला स्नेक गोर्ड असे म्हणतात. संस्कृतमध्ये पटोल तर शास्त्रीय भाषेत ट्रीचोसानथिस डॉईका म्हणतात. पडवळ ही वनस्पती कुकर बिटेसी या कुळातील आहे. पडवळ ही फळभाजी संपूर्ण भारतात आढळते. त्यामध्ये दक्षिण भारतात फारच लोकप्रिय आहे. पडवळाचा वेल वर्षांयू व भरभर वाढणारा असतो. पडवळाचा वेल हा सहसा उष्ण हवेत वाढतो.

औषधी गुणधर्म
कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, रिबोफ्लेमीन, थायमिन, कॅरोटीन नायसिन प्रथिने, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ स्निग्धता हे सर्व पोषक घटक असतात. आयुर्वेदानुसार पडवळ हे शीतल, रेचक, सारक, कृमीनाशक आणि वांतीकारक आहे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
forecast to rain along with wind in most parts of the state
गुढीपाडव्याला हलक्या सरी?
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

उपयोग
० पित्तप्रकोपाने ताप आल्यास पडवळाचा काढा घ्यावा. पडवळ हे रेचक गुणधर्माचे असल्याने पोट साफ होऊन ताप उतरतो. ताप अधिक प्रमाणात असल्यास या काढय़ात कोिशबीर, काढेचिराईताचा रस व मध घालून प्यावा.
० पडवळामध्ये कमी उष्मांक असल्यामुळे हृदयरोग, मधुमेह या आजारांवर ते उत्तम प्रकारचे टॉनिक आहे. या आजारामध्ये पडवळ नियमित खाल्ल्यामुळे रसरक्त वाहिन्यांमधील अडथळा दूर होतो व रक्तपुरवठा सुरळीत होऊन वरील आजार कमी होतात.
० लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे पडवळाचा वापर करावा.
० छातीत धडधडणे, दुखणे, चमका, मारणे इत्यादी तक्रारींवर पडवळाचा रस दिवसातून ३ वेळा २ चमचे घ्यावा.
० पडवळ हे कृमीनाशक असल्यामुळे पोटातील कृमी शौचावाटे पडून जाण्यासाठी पडवळाच्या बियांची पूड १-१ चमचा दोन वेळा घ्यावी.
० अपचन, पोटात गुबारा धरणे, शौचास साफ न होणे. या तक्रारीवर पडवळाच्या बियांची पूड १-१ चमचा दोन वेळा घ्यावी. यामुळे पोटातील गुबारा कमी होऊन शौचास
साफ होते.
० सांधे सुजून दुखत असतील तर अशा वेळी पडवळाच्या पानांचा रस कोमट करून सांध्याच्या ठिकाणी लावावा. साध्यांची सूज कमी होते.
० पडवळाचे मूळ हे रेचक गुणधर्माचे असल्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचाविकारावर ते चांगल्या प्रकारे परिणाम करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो. पडवळाच्या कोवळ्या फांद्या व वाळलेली फुले यांचा काढा साखर घालून घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते.

 डॉ. शारदा महांडुळे
sharda.mahandule@gmail.com