महात्मा गांधी यांचे वास्तवदर्शी विश्लेषण करण्याचा प्रयत्न आजवर अनेक अभ्यासकांनी केला आहे. भारतीय राजकारणाच्या वाटचालीत या आदरणीय व्यक्तिमत्त्वाची अनेक रूपे विविध गटातटांकडून अनेकदा वापरण्यात आली. गोरक्षण आणि आता गोहत्याबंदी या धर्मवादी अँटिसेक्युलर प्रकाराचे जनकही गांधीजीच! आत्मक्लेश, अहिंसावादाचा अतिरेक, ब्रह्मचर्य, ग्रामस्वराज्य यासारख्या त्यांच्या काही संकल्पना प्रगतीविरोधी आणि प्रतिगामी असल्याचे दिसत असूनही त्यांचा वापर सोयीने आज होताना दिसतो. अशावेळी आठवण होते ती, गांधीजींना पूज्य ठरवणाऱ्या; परंतु त्यांचे न ऐकता आधुनिकतेचा पुरस्कार करत आपला अजेंडा राबवून देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या पं. नेहरू आणि डॉ. आंबेडकरांची! आजच्या गांधीजयंतीनिमित्ताने गांधीवादातील वैचारिक दोषांसंबंधीचे हे चिंतन..

आपली बाजू इतकी चोख असली पाहिजे की विरोधकाला बोट ठेवायला जागा उरणार नाही. इतर सर्वाना ती पटेल. आणि मग नैतिकदृष्टय़ा एकटय़ा पडलेल्या विरोधकाला आत्मपरीक्षण करणे भाग पडेल! ही लढापद्धती जगाला देणारे महात्मा गांधी. गोलमेज परिषदेला गेले असता मँचेस्टरच्या गिरणी कामगारांना आवर्जून भेटून भारतीयांची बाजू समजावून सांगणारे महात्मा गांधी. कितीही वाईटपणा घ्यावा लागला तरी नेत्याने लोकांना भरकटू द्यायचे नसते, हा आग्रह धरणारे महात्मा गांधी. स्वत:च्या जीवनातला गैरसोयीचा भागही आवर्जून प्रांजळपणे व धैर्याने मांडणारे महात्मा गांधी. कोणतेही अधिकारपद न घेतासुद्धा प्रचंड जनसमुदायाला आपले अनुयायीत्व स्वीकारायला लावणारे महात्मा गांधी. समतेचा बोलबाला असताना ‘सर्वोदय’ हे समतेपेक्षा वेगळे आणि जास्त व्यवहार्य व जास्त इष्ट तत्त्व उचलून धरणारे महात्मा गांधी. या व अशा अनेक रूपांत मी अत्यंत आदराने त्यांना नमन करतो. मात्र, असे असूनही गांधी-विचारांमधील दोषांचे चिकित्सक भान ठेवले पाहिजे. ते यावे म्हणून, गांधीजींमधील आक्षेपार्ह गोष्टींची आठवण करून देण्यासाठी, काही अप्रिय गोष्टी थोडक्यात, पण कठोरपणे मांडणे भाग आहे.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

अंतिमत: अहिंसेचे तत्त्वच मानवाला तारून नेईल यात वादच नाही. पण स्व-हिंसा करणे किंवा स्वजन- हिंसा होऊ  देणे म्हणजेही अहिंसा नाही. अहिंसेचे तत्त्व मनुष्यांपुरते अंगिकारले जायलाही वेळ लागणार आहे. ते घडायच्या आधीच इतर जीवांनाही ते तत्त्व लागू करता येण्याइतकी नैतिक उन्नती आणि तांत्रिक प्रगती अद्याप झालेली नाही. उद्या एखादे उच्च तंत्र सापडून कदाचित आपण प्रत्येक अन्नघटक सिंथेसाइजही करू शकू. अरेच्चा! पण मग ते जैव राहणार नाही! आपल्याला सगळे काही जैव हवे; आणि ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे मात्र निषिद्ध! हा उल्लेख अशासाठी, की गोरक्षण आणि आता गोहत्याबंदी या धर्मवादी अँटिसेक्युलर प्रकाराचे जनक गांधीजीच आहेत.

आत्मक्लेश ही गोष्ट सत्याग्रहासाठी वापरली जातेय, की इमोशनल ब्लॅकमेलिंग करून, सट्ल हुकूमशाही करून, स्वत:चे निर्णय इतरांवर लादण्यासाठी? हे कसे ओळखावे? आत्मक्लेश ही गोष्ट ना सर्वाना झेपणारी, ना जीवनरीत बनू शकणारी. पण गांधीजी माणसांना धर्माच्या दावणीला बांधून अर्थव्यवस्था आणि राज्यपद्धती मागास ठेवण्याचा आग्रह धरतात.

आश्रमातील कोणा एका मुलीच्या केसांचे गांधीजींच्या मुलाला आकर्षण वाटले. यात काहीही भयंकर घडलेले नव्हते. त्यावर त्या मुलीचे केस कापून टाकणे हा कोठला न्याय? हे केशवपनाचे किंवा बुरख्याचे लॉजिक झाले.

अंधश्रद्धा, दुराग्रह आणि खुळचटपणे

गांधीजींची मानसिकता काही अंधश्रद्धांनी ग्रस्त होती. अहंकार विस्तारण्याला ‘आत्मावस्था’ म्हणणे हे अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनेही वादग्रस्त आहे. पण गांधीजींचा अहंकार कधी कोणाला त्यांच्या ‘स्व’मध्ये समाविष्ट करील आणि त्यांना हवे तसे नाचवेल, हे सांगता यायचे नाही. माझे ब्रह्मचर्य कमी पडले म्हणून फाळणीत हिंसाचार झाला, असे मानण्यात एक परिपूर्ण आत्मा सर्व समाजाला नियंत्रित करतो, अशी अंधश्रद्धा दिसून येते.

अहिंसेला चिकटून ब्रह्मचर्य आलेच पाहिजे, हेही विचित्र आहे. लैंगिकतेला एकुणातच पाप मानणे अनैसर्गिक आहे. हरीलालच्या वेळी आम्ही कामासक्त होतो म्हणून हरीलाल बिघडलेला निघाला- ही कुठली कारणमीमांसा? म्हणजे उदाहरणार्थ, मणिलालच्या वेळी तुम्ही काय सत्याग्रह करत होतात? कामासक्त नसताना कर्तव्यबुद्धीने संभोग करणे हे एक वेळ स्त्रीला जमेलही, पण पुरुषाला मुदलात जमणारच कसे? विनोबाजींचे भक्त आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे जाणकार प्राध्यापक दिवंगत श्रीनिवास दीक्षित यांना मी समक्ष प्रश्न विचारला होता की, ब्रह्मचर्य खरोखर असते का? त्यावर त्यांनी, ‘अगदीच अपवादाने ऊध्र्वरेता पुरुष असू शकतो,’ हे शास्त्रार्थातील उत्तर दिले होते. ‘वैज्ञानिकदृष्टय़ा कसे?’ यावर त्यांनी मंद स्मित करून सोडून दिले.

आश्रमातील कोणा एका मुलीच्या केसांचे गांधीजींच्या मुलाला आकर्षण वाटले. यात काहीही भयंकर घडलेले नव्हते. त्यावर त्या मुलीचे केस कापून टाकणे हा कोठला न्याय? हे केशवपनाचे किंवा बुरख्याचे लॉजिक झाले. स्वत:चे ब्रह्मचर्य तपासून पाहण्यासाठीच्या प्रयोगात स्वत:च्या नातीच्या वयाच्या मुलींना समाविष्ट करून घेताना त्यांच्या मनाचा काय विचार केला? म्हणजे सत्याचे प्रयोग तुमचे; पण प्रयोगातले उंदीर कोणालाही बनवावे, हे कसे अहिंसक ठरते? संसदीय लोकशाहीला वेश्या आणि वांझ ठरवण्यात संसदीय लोकशाहीचा अवमान तर आहेच; पण स्त्रीची इतिकर्तव्यता पातिव्रत्य आणि संतती निर्मिणे यातच आहे असेही त्यातून व्यक्त होते. जे गांधीजी एकीकडे ग्रामराज्य संपूर्ण सहमतीने चालावे असे म्हणतात, ते जयप्रकाश नारायण यांच्या पत्नीला ब्रह्मचर्याची दीक्षा देऊन टाकताना जयप्रकाशजींची संमती घ्यायचीसुद्धा गरज मानत नाहीत, हे कसे? खरे तर दुरितांचे उगमस्थान अहंकार आहे. पण त्याऐवजी शरीराला नरकद्वार मानणे हा खास धर्मवादी घोटाळा आहे. किंबहुना, रा. स्व. संघातल्या बुरसट कल्पनांना गांधी हाच मोठा आधार आहे. मनुष्याला मूलत: पापी समजण्याचे ख्रिश्चन तत्त्व गांधीजींनी इंग्लंडमध्ये प्युरीटनांकडून उचलले आणि ते हिंदू व जैन विचारांत घुसवले.

पश्चिमद्वेष आणि ‘पूर्व’गौरव या वृत्तीचे गांधीजी हे एक जनक होते. ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकात त्यांनी प्रगतीविरोधाचे अचाट युक्तिवाद दिले आहेत. रेल्वेमुळे रोगाच्या साथी पसरतील हे त्यांना दिसले. पण अँटिबायोटिक्स आणि लसीकरण हे किमान रेल्वे तरी असलेल्या औद्योगिक क्रांतीतूनच येतात हे लक्षात घेतलेले दिसत नाही. आज पाश्चात्त्यांवर त्यांची तंत्रे आणि संस्थात्मक ढाचा यथेच्छ वापरून वर दुगाण्या झाडण्यासाठी लुई पाश्चरची सुई टोचूनच आपण अस्तित्वात आहोत, हे कोणी विसरू नये. तंत्रनिर्मिती हे मानवाचे पहिले ज्ञातिलक्षण असून श्रमविभागणी आणि विनिमय हे दुसरे तितकेच महत्त्वाचे ज्ञातिलक्षण आहे. निअँडरथाल-मानव नष्ट झाला; कारण जरी तो हत्यारे बनवत असला, तरी ना तो श्रमविभागणी करू शकला, ना टीमवर्कला लागणारी भाषा घडवू शकला. मात्र, होमोसेपिअन (म्हणजे आपणच!) ते करू शकला. स्वावलंबन ही फार महागडी गोष्ट आहे. ज्याला जे काम सर्वात जास्त चांगले जमते, त्यालाच ते करायला देण्यात सर्वाचाच फायदा असतो, हे अर्थशास्त्राचे प्राथमिक तत्त्व आहे. हे तत्त्व नाकारणारे ‘हिंदू अर्थशास्त्र’ हे शुद्ध थोतांड आहे.

भारताला डॉ. आंबेडकर आणि नेहरू हे गांधीजींचे अजिबात न ऐकणारे कट्टर आधुनिकतावादी नेते लाभले म्हणून ठीक आहे. त्यांनी गांधीजींना पूज्य ठरवून आपलाच अजेंडा पुढे रेटला. नपेक्षा भारत खरोखरच गतवैभवात रमणारा कर्मदरिद्री देश झाला असता! ‘श्रमाची उत्पादकता कमी ठेवली (चरखा) तर जास्त रोजगार निर्माण होतो’ ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. उत्पादनाच्या प्रेरणा नुसत्या नैतिक निग्रहावर विसंबून अर्थव्यवस्था उभी राहत नाही. मनुष्यस्वभाव जसा आहे तसा मानूनच हळूहळू बदलता येतो. ‘प्रकृती नाचवी जीवा, निग्रहे काय होतसे?’ (गीता- ३.३३.२) हे विसरून चालणार नाही.

स्वराज्याची ‘ग्राम्य’ कल्पना

‘ग्राम्य’ या शब्दाला ‘व्हल्गर’ असा अर्थ आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना ‘व्हल्गर’ मानणे हे चूकच आहे. पण शहरांमधले सुख दुखणारे काही श्रीमंत खरोखरच ‘व्हल्गरपणे’ ग्रामस्वराज्य पुरस्कृत करीत आहेत. यात मुळात भारतातील ग्रामव्यवस्था आदर्श होती असे गृहीत धरलेले आहे. ग्रामव्यवस्था वंशाधिष्ठित, उतरंडीवर आधारित, स्पर्धाहीन, गतिहीन आणि वाढरहित होती. जातीव्यवस्था हा ग्रामव्यवस्थेचा अविभाज्य घटक होता. या व्यवस्थेला इतकी प्रचंड अनुत्पादकता शतकानुशतके कशी परवडली? याचे उत्तर- तिला भरपूर मृत्यूप्रमाण लाभल्याने लोकसंख्यावाढीचा रेटाच नसणे आणि ऐहिक अभ्युदयाला तुच्छ लेखणे, हे आहे. लहान गाव, ते बा स्पर्धेपासून, बाह्य़ पर्यवेक्षणापासून संरक्षित, तसेच त्यातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला नाही, हे भयानक दमनकारी आहे. आजही खाप पंचायतछाप दमन चालू आहेच. त्याचेही समर्थन ‘व्यक्तीने कुळासाठी समर्पित व्हावे’; मग ‘ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत’, वगैरे असे केले जाते. मॅक्रो-इकॉनॉमीला स्वत:चे गतिशास्त्र असते याचे भान न ठेवता ‘मायक्रो’त तथाकथित आदर्श बनवायचा, हे अत्यंत बालिश आहे. स्थानिक अनुभवावरून व्यापक परिणाम कळूच शकत नाहीत. सद्हेतू असला की सुपरिणामच होतील, हेच मुळात खरे नाही.

शरीराला नरकद्वार मानणे हा गांधीजींचा खास धर्मवादी घोटाळा आहे. किंबहुना, रा. स्व. संघातल्या बुरसट कल्पनांना गांधी हाच मोठा आधार आहे. मनुष्याला मूलत: पापी समजण्याचे ख्रिश्चन तत्त्व गांधीजींनी इंग्लंडमध्ये प्युरीटनांकडून उचलले आणि ते हिंदू व जैन विचारांत घुसवले. अशा अनेक प्रतिगामी ‘संघीय’ संकल्पनांची देन गांधींनी दिली. याकरता रा. स्व. संघीय स्वदेशीवाद्यांना एक सूचना करावीशी वाटते, की त्यांनी गोळवलकरांच्या शेजारी गांधीजींचा फोटो लावावा, म्हणजे निदान काहीतरी सुसंगती येईल.

मोहन हिराबाई हिरालाल यांचा अनेकदा छापला गेलेला, पण एकदाही ‘तासला’ न गेलेला एक लेख ग्रामस्वराज्याचे मॉडेल मांडतो. हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या ५०० जणांचा समुदाय म्हणजे एक ग्राम. याला राष्ट्राचा दर्जा दिला पाहिजे. त्यातील ‘नागरिकांनी’ सर्व निर्णय संपूर्ण सहमतीने घेतले पाहिजेत. म्हणजे संपूर्ण सहमती होईपर्यंत निर्णयच घेता कामा नये. समजा, एखादी नवी लस आली, तर ती टोचावी की नाही, यावर एकमत होईपर्यंत ती टोचायची नाही. निर्णय न घेणे हाही एक निर्णयच असतो. म्हणजे आपोआपच ‘जैसे थे’ (स्टेटस को) यशस्वी होत राहणार. हाकेच्या अंतरावर राहणाऱ्यांना अंतरीची हाक ऐकू जाईलच, हा अशक्य योगायोग आहे. ५०० जणांची सभा ही अत्यंत दमनकारी असते. नीट चर्चा फार तर नऊजणांची होऊ  शकते.

या मॉडेलात ‘किमती कशा ठरवायच्या?’ याचा विनोदी फॉम्र्युला आहे. ३३% कच्च्या मालाला, ३३% श्रमिकाला आणि ३३% समाजाला द्यायचे. एकतर हे प्रमाण (प्रपोर्शन) उद्योगनिहाय बदलेल. मुख्य म्हणजे कशाच्या ३३%? किंमत तर अजून ठरायचीच आहे! याहून विनोद असा की, हे हौसिंग सोसायटी, कारखाना, संस्था अशा कोणत्याही समुदायाला ग्रामाचा दर्जा देतायत. अनेक ‘ग्रामां’त सहभागी असलेल्या माणसाने त्यापैकी कोणत्या ग्रामाचे ऐकायचे? दोन गावांमध्ये अगदी साधा नदीच्या पाण्याचा तंटा उभा राहिला की ग्रामांच्या वरचे न्यायालय लागणारच. तसेच समुद्रकिनारा नसणाऱ्यांनी मीठ कुठून आणायचे?

आज नागरीकरणाचे आणि औद्योगिकीकरणाचे फायदे समजलेल्यांना अशा ग्रामांत कोंबायचे तर माओवादच लागेल! सुदैवाने ग्रामस्वराज्यवादी हे अहिंसावादी आहेत. ते एखादे ग्राम बनवून त्यातील निरामय जीवन दाखवतील. मग हळूहळू सगळेच लोक शहरे व उद्योग सोडून स्वेच्छेने ग्रामे वसवायला निघतील. निघू देत बापडे! स्वेच्छेने असेल तर आपली काही हरकत नाही.

रा. स्व. संघीय स्वदेशीवाद्यांना एक सूचना करावीशी वाटते. त्यांनी गोळवलकरांच्या शेजारी गांधीजींचा फोटो लावावा, म्हणजे निदान काहीतरी सुसंगती येईल.

राजीव साने – rajeevsane@gmail.com