साडीवर सनग्लासेस, जॅकेट्स, कोट, मुघल कॅप, आणि बेल्ट्स हे प्रकार वापरत नवाच लुक कॅरी करण्याचा फंडा रुजलाय. अर्थात, यात सगळ्यात आवडीचा ठरलाय तो म्हणजे बेल्ट किंवा पट्टा.

साडीवर परिधान करण्यासाठी ब्रुच, छल्ला, मेखला, कमरपट्टा यांचं पारंपरिक प्रस्थ आहे. त्यातही सोने, चांदी आणि डायमंड या प्रकारांनी बनवलेल्या या पारंपरिक अ‍ॅक्सेसरीज साडीशी घट्ट नातं जोडलं आहे. कमरपट्टा हा यातील सर्वात जास्त आवडीने मिरवण्याचा प्रकार मानला जातो. लग्नासमारंभापासून ते चित्रपटांमध्येही साडीवर कमरपट्टा दिसतो तसेच लेहेंगा, घागरा-चोळी, गुजराती साडय़ांवरही कमरपट्टा पाहायला मिळतो. मात्र साडीत सजण्यासाठी केवळ पारंपरिक दागिन्यांचा सोस करण्याचे दिवस गेले आहेत. साडीवरच्या साजशृंगारासाठीही आता अत्याधुनिक पर्यायांचा वापर केला जातो आहे. साडीवर सनग्लासेस, जॅकेट्स, कोट, मुघल कॅप, आणि बेल्ट्स हे प्रकार वापरत नवाच लुक कॅरी करण्याचा फंडा रुजलाय. अर्थात, यात सगळ्यात आवडीचा ठरलाय तो म्हणजे बेल्ट किंवा पट्टा. साडीवरच्या नाजूक कमरपट्टय़ाची जागा घेत बेल्टने सध्याच्या फॅशन ट्रेण्डमध्ये आपली एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

dharashiv lok sabha marathi news
धाराशिवमध्ये अपक्षा हाती तुतारी, संभ्रम दूर करण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

सध्या साडीवर बेल्ट्स परिधान करण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. तसं पाहायला गेलं तर साडी निऱ्यांपासून सांभाळता यावी या कोरणासाठी कमरपट्टय़ाची फशन महत्त्वाची ठरते. तर सध्या या बेल्टची फॅशनही साडी कमरेपासून व्यवस्थित सांभाळता यावी म्हणून आहे. २०१४ पर्यंत ही फॅशन ट्रेण्डमध्ये होती, परंतु त्यानंतर हरवलेली ही फॅशन गेल्या वर्षीपासून पुन्हा ट्रेण्डमध्ये आली आहे. ऑनलाइनवरही सध्या हे बेल्ट्स उपलब्ध आहेत, परंतु डिझायनर्सनी कमरपट्टा व बेल्टच्या फॅशनमध्ये खूप फरक ठेवला आहे, ही फॅशन करण्यामागचे कारण एकच असले तरी.. जेनेलिया डिसूजा, करीना कपूर, कलकी कोचलिन, शिल्पा शेट्टी, फ्रिडा पिन्टो या सेलिब्रेटीजनी साडीवरचा शृंगार म्हणून बेल्ट्स वापरले आहेत. सध्या अदिती राव हैदरी, श्रद्धा कपूर, सोनम कपूर, करीना कपूर यांनी ही फॅशन परत ट्रेण्डमध्ये आणत साडीवरचा हा बेल्टधारी लुक फॉलो केला आहे. त्यामुळे डिझायनर्स सुद्धा साडीवरच्या बेल्ट फॅशनमध्ये प्रयोग करतायेत. हे सगळे बेल्ट्स अ‍ॅमेझॉन, अजिओ.कॉम, फ्लिपकार्ट, कुवस, स्नॅपडील, हॉमस्टोअरवर परवडणाऱ्या किमतीत हमखास मिळतील.

साडीवर खास परिधान करण्यासाठीचे ट्रेण्डी बेल्ट्स

  • लेदर बेल्ट्स – अनामिका खन्नाने या वेळेस काही ट्रेण्डी बेल्ट्स खास साडीसारख्या ट्रॅडिशनल आऊटफिटवर परिधान करण्यासाठी आणले आहेत. तिचे संपूर्ण कलेक्शन हे बेल्ट्सवर आधारित आहे, कारण बेल्ट्स प्रत्येक आऊटफिटवर शोभून दिसतात. त्याच अर्थाने तिने साडीवरही लेदर बेल्ट्स आणले आहेत. या बेल्टचा फायदा असा की एकसारख्या पॅटर्नच्या किंवा मल्टिपॅटर्न असणाऱ्या साडीवर हे बेल्ट्स खुलून दिसतील. यात बोल्ड कलरपासून ते हॉल्टर ब्लाऊजपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सब्यासाचीने यूनिपॅटर्न असणाऱ्या साडीवर लेदर बेल्ट्स आणले आहेत. लेदर बेल्ट्स खासकरून सिल्क, कॉटन, ट्रान्स्परन्ट नेट साडीवर वापरू शकता. त्यातही हॅण्डीक्राफ्ट ते जरीच्या साडीवर लेदर बेल्ट्स डिझायनर पायल खांडेलवालने आणले आहेत. विशेष म्हणजे कलकी कोचलिनने एथनिक साडीवर लेदर बेल्ट्सचाच पर्याय ठेवला आहे. अनुष्काने तिच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये लेहेंग्यावर सब्यासाचीचा मडी ग्रीन रंगाचा लेदर बेल्ट वापरला होता, पण लेहेंग्याची रचना साडीप्रमाणे ठेवली होती. क्लोज्ड, लॉक अप लेदर बेल्ट्स विविध रंगांमध्ये ऑनलाइनवर आहेत. त्यामुळे लेदर बेल्ट्समध्ये सर्वाधिक पर्याय उपलब्ध आहेत.
  • कॅनव्हास बेल्ट्स : काही वेळेस साडीचा रंग सारखा असेल तर सारख्या रंगांचेच बेल्ट वापरले तर ते दिसणारच नाहीत. त्यामुळे डार्क रंगाच्या साडय़ा वापरताना फिकट रंगांचे कॅनव्हास बेल्ट्स वापरू शकता. तर किरन उत्तम घोष या डिझायनरने डार्क रंगाचे कॅनव्हास बेल्ट्स गोल्डन व लाइट रंगाच्या ट्रॅडिशनल आऊटफिटवर आणले, त्यात साडीसारख्या लुकवर टेक्स्चरचा विचार केला. कॅ नव्हास बेल्ट्स हे साधारणत: पॅचवर्क असणाऱ्या साडीवर वापरू शकता. ज्यात साडीच्या विरुद्ध रंगाच्या कॅनव्हास बेल्टचा वापर होईल. जेणेकरून पार्टी वेअर म्हणून तो उत्तम ठरेल. तन्वी केडिया या डिझायनरने राजस्थानी लुकवर कॅनव्हास बेल्ट्स ठेवले त्यामुळे अस्सल भारतीय लुक म्हणून आरसे, ग्लोडन, रेशमी एम्ब्रॉयडरी असलेल्या साडीवर कॅनव्हास बेल्ट्सचा पर्याय उत्तम वाटेल. त्यातही सहावारीपासून ते नऊवारी साडीचा विचार केला गेला आहे. त्यातून लग्नसभारंभात नऊवारी साडीवर हे बेल्ट्स मिरवू शकता.
  • कापडी (क्लॉथ) बेल्ट्स : मणी, डायमंडपासून वेलवेट, फर, फेदपर्यंत अशा अनेक टाइपचे क्लॉथ बेल्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. भरपूर एम्ब्रॉयडरी असलेल्या साडीवर असे बेल्ट्स आकर्षक वाटतील. हाय वेस्ट असणाऱ्या या क्लॉथ बेल्ट्सने कमरेचा जास्त भाग झाकला जातो म्हणून ब्लाऊजच्या पर्यायांमध्ये एकाच रंगाच्या ब्लाऊजपासून फुल हॅण्ड ब्लाऊज वापरता येईल. सेमी किंवा स्लिवलेस ब्लाऊज टाळल्यास हाय वेस्ट बेल्ट कमरेवर हायलाइट होईल. तरून ताहिलियानी या डिझाइनरने कांजीवरम साडीवर ब्लाऊजच्याच रंगाचे हाय वेस्ट क्लॉथ बेल्ट्स आणले, ज्यामुळे तसे बेल्ट्स साडीवर जास्त उठून दिसले. डिझाइनर सुमोना पारेख व फॅशन वेबसाइटच्या डिरेक्टर यशोधरा श्रॉफ यांनी त्यांचे स्वत:चे असे साडीवरच्या बेल्ट्सचे ट्रेण्ड सांगितले होते, ज्यात एम्ब्रॉयडरी असलेले कापडी बेल्ट्स हे पैठणी, कांजीवरम, जरीच्या साडय़ांवर आणले, त्यामुळे क्लॉथ बेल्ट्स हे पारंपरिक साडीवर हमखास वापरता येतील. विशेष म्हणजे ब्लाऊजच्या उरलेल्या कापडाचा किंवा साडीच्या उरलेल्या कापडाचा बेल्ट म्हणून जुगाड करता येईल. इलियाना डिक्रुजने क्लॉथ बेल्टची फॅशन एका इव्हेंटसाठी फॉलो केली होती.
  • पोनी (वेस्ट बॅण्ड) बेल्ट्स : ‘पोनी’ किंवा ‘बो’ अशा स्ट्रक्चरचे बेल्ट खासकरून पिकॉक स्ट्राइप, पोलका डॉट, झेब्रा स्ट्राइप अशा डिझाइनच्या क्लोज रंगातल्या साडय़ावर असे बो/ वेस्ट बॅण्ड खुलून दिसतात. सोनम कपूरने ब्लू झेब्रा स्ट्राइपच्या साडीवर रिबनचा पोनी बेल्टचा लुक केला होता. डेनिम साडीवर वेस्ट बॅण्ड शोभतात. एकाच रंगाच्या साडीचा पर्याय टाळून मल्टिस्ट्राइप किंवा लाइन, चेक्स व टायगर स्किन स्ट्राइपच्या साडय़ांचा विचार होऊ शकतो. यात सर्व रंगांच्या शेड्सचा मिलाफही मेटल बेल्ट घातल्यावर तसेच ग्लॉसी शेडच्या साडय़ांमुळेही वेगळीच ओळख मिळेल. साडीवरच्या रंगाचे फ्युजन हे खूप आकर्षित करेल. फ्लोरल साडय़ावर पोनी बेल्टचा पर्याय खुला आहे. डिझाइनर शिल्पा रेड्डीने स्ट्राइप साडीवर वेस्ट कटवर्क बेल्ट ठेवून रफल्सच्या ब्लाऊजची फॅशन ठेवली आहे, त्यामुळे एक रॉयल लुकही मिळतो किंवा कॉलरचा ब्लाऊजही फॉर्मल लुक म्हणून योग्य ठरेल.
  • मेटल बेल्ट्स : मेटल बेल्ट्स हा सर्वात नावाजलेला प्रकार. मेटल बेल्ट्सची क्रेझ प्रचंड आहे. या बेल्टमुळे साडीच्या पेहरावाला एक वेगळाच लुक मिळतो व तो सर्वात हिट आहे. गोल्डन, ग्रे शाइन कलरपासून ते चमकणाऱ्या शिमपर्यंत हे बेल्ट्स खासकरून साडीवर युनिक दिसण्यासाठी आहेत. साडीवर मेटल बेल्ट असल्यास इंडो वेस्टर्न लुक मिळतो. सध्या इंडो-वेस्टर्न लुकही सर्रास वापरला जातो, त्यामुळे मेटल बेल्ट्सचा पर्याय उत्तम आहे. साडीचा पदर गळ्यामागून खांद्यावर पुढे घेऊन मेटल बेल्ट्स घातल्यास एक वेगळी स्टाइल स्टेटमेंट म्हणून जरा हटके लुकही मिळतो. ब्लॉक प्रिंट, डायिंग साडय़ावर असे बेल्ट्स ट्रेण्डमध्ये आहेत. साऊथ इंडियन साडय़ांच्या पेहरावावर असे बेल्ट नक्कीच योग्य आहेत. साडीची बॉर्डर खूप मोठा यूएसपी आहे. डिझाइनर अमित अग्रवालने पटोला साडीवर मेटल बेल्ट्स आणले आहेत.
  • इलॅस्टिक वेस्ट बेल्ट्स (बकल अ‍ॅण्ड स्निच) : बाटिक प्रिंट, हॅण्डलूम ते हॅण्डवुलन साडय़ांपासून बकल्स हे दागिन्यांप्रमाणे दिसतात. हिरे, मोती व माणिक यांचा एम्ब्रॉयडरी म्हणून अशा बेल्ट्सवरही हमखास वापर होतो. मॅटर्निटी बेल्ट म्हणूनसुद्धा या बेल्ट्सकडे पाहिले जाते, ज्यात भरीव एम्ब्रॉयडरी कमी असते. यात वुलन बेल्ट्सचा लुक खूप हटके वाटेल. कोटा कॉटन, शिफॉन प्रिंट किंवा स्टिच एम्ब्रॉयडरीवरच्या साडय़ांवर असे बेल्ट्स वापरू शकता. अशा साडय़ांवर इलॅस्टिक बेल्ट्स घातल्यास त्यावर शालीच्या कापडाचा वापरही होऊ शकतो. यात चंदेरी साडय़ांपासून ते शिबोरी प्रिंट यासारख्या साडय़ांपर्यंत पर्याय आहेत. खादी, कॉटन यांसारख्या साडय़ांवर असे बेल्ट्स आपण परिधान करू शकतो. वेगळवेगळे स्लोगन, कोरीव एम्ब्रॉयडरी असलेल्या साडय़ांवर हे बेल्ट्स शोभून दिसतात. वुलन किंवा मण्यांपासून तयार केले जातात. त्यात कॉन्ट्रास्ट किंवा सेमिट्रिकल अथवा एसेमिट्रिकल प्रकार असतात त्यातही सेमिट्रिकल बेल्ट्स वापरले जातात. ‘इटसी’ या फॅशन वेबसाइटवर हे बेल्ट्स आहेत. सेमिट्रिकल बेल्ट्सवर वुलनपासून तयार केलेले लटकनही बनवले जातात. रिद्धी मेहराने पॅटल्स टाइप बकल्स आणले तसेच करिश्मा शहानीने सेमिट्रिकल शीर लेएर्ड बेल्ट्स आणले. यात खासकरून बीडेड बेल्ट्सचा समावेश होतो.
  • स्ट्रॅप बेल्ट्स : कॉपर बेल्टचा वापर जॉर्जेट किंवा ब्रॉकेट साडय़ावर होऊ शकतो तर कॉपर बेल्टप्रमाणे अनुश्री रेड्डीने तिच्या ब्रायडल कलेक्शनमध्ये ब्लाऊजच्या रचनेचा स्ट्रॅप बेल्टचा लुक दिला होती. रितू कुमारने बनारसी लुकवर काही स्ट्रॅप बेल्ट्स आणले. न्यूड एम्ब्रॉयडरीवर हे बेल्ट्स उत्तम ठरतील. क्रॉस कलरवर साधारणपणे मरून – ब्लॅक किंवा ऑरेंज – पर्पलवर हे बेल्ट्स ब्रायडल वेअरसाठीही योग्य आहेत. डिझाइनर निखिल थाप्पीने मेटल व स्ट्रॅप बेल्टचा संयोग साधलेला न्यूड मॅट साडीवरचा लुक ट्रेण्डमध्ये आहे. श्वेता कपूरचे पेटंट स्ट्रॅप बेल्ट्स ट्रेण्डमध्ये आहेत. फराज मनने ट्राऊ झर साडी व स्ट्रॅप बेल्ट कॉम्बो आणला आहे. अनुज मोदीने देखील डॉटेड कांजीवरम साडीवर स्ट्रॅप बेल्ट आणला आहे. कॅटरीना कैफनेही साडीवर स्ट्रॅप बेल्टचा लुक फॉलो केला आहे. युनिसेक्स बेल्ट म्हणून स्ट्रॅप बेल्ट प्रसिद्ध आहेत. कुंदन स्टोनची एम्ब्रॉयडरीही पाहायला मिळते. क्राफ्टसविलावर विविध पर्यायातील स्ट्रॅप बेल्ट्स १००० रूपयांच्या आत उपलब्ध आहेत. एनविला मिश्राचेही काही हटके स्ट्रॅप बेल्ट्स साडीवर घालण्यासाठी उपलब्ध आहेत. स्लिक, ब्रॉड बेल्ट्सचा यात समावेश होतो.

viva@expressindia.com