चिनी अ‍ॅप्स बॅन झाल्यानंतर अनेक भारतीय युजर्स फाइल शेअरिंग अ‍ॅप Share It ला पर्याय शोधत होते. युजर्सच्या या समस्येला एका 17 वर्षीय भारतीय तरुणाने दूर केलं आहे. या तरुणाने Dodo Drop नावाचं एक अ‍ॅप डेव्हलप केलं आहे. या अ‍ॅपद्वारे युजर शेअर-इटप्रमाणे इंटरनेटशिवाय दोन डिव्हाइसमध्ये ऑडिओ, व्हिडिओ, इमेज आणि टेक्स्ट शेअर करु शकतात.

“भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर त्यांना पर्याय म्हणून मी हे अ‍ॅप डेव्हलप करायला सुरूवात केली. चार आठवड्यांमध्ये मी हे अ‍ॅप पूर्णपणे डेव्हलप केलं”, असं १७ वर्षांच्या अश्फाक महमूद चौधरी याने सांगितलं.  Share It ला पर्याय म्हणून हे अ‍ॅप डेव्हलप केल्याचं जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेला अश्फाक म्हणतो.

(CamScanner, टिकटॉकवरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट)

“डेटा सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने चिनी अ‍ॅप्सना बॅन केले. त्यात फाइल शेअरिंग अ‍ॅप Share It चाही समावेश होता. त्यामुळे अनेक युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत होता म्हणून मी एक फाइल शेअरिंग अ‍ॅप डेव्हलप करण्याचं ठरवलं”, असं त्याने वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितलं.

“या अ‍ॅपद्वारे युजर शेअर-इटप्रमाणे इंटरनेटशिवाय दोन डिव्हाइसमध्ये ऑडिओ, व्हिडिओ, इमेज आणि टेक्स्ट शेअर करु शकतात. 1 ऑगस्ट रोजी लाँच झालेल्या Dodo Drop अ‍ॅपद्वारे युजर 480Mbps च्या स्पीडने फाइल शेअर करु शकतात. हा स्पीड शेअर-इट पेक्षाही जास्त आहे. अ‍ॅप वापरण्यास सोपं असून सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे”, असा दावाही अश्फाकने केला आहे.

(CamScanner, टिकटॉकवरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट)